शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

गाडगेबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2016 00:35 IST

वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांचा ६० वा पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप बुधवारी झाला. सकाळी १० वाजता काढण्यात आलेल्या ...

प्रतिमेची शोभायात्रा : गोपाला-गोपाला देवकीनंदन गोपालाचा जयघोष अमरावती: वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांचा ६० वा पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप बुधवारी झाला. सकाळी १० वाजता काढण्यात आलेल्या गाडगेबाबांच्या प्रतिमेच्या शोभायात्रेने अवधी अंबानगरी दुमदुमली. काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने पुण्यतिथी महोत्सवाची सांगता झाली. १४ ते २१ डिसेंबर दरम्यान गाडगेनगर येथील गाडगेबाबांच्या समाधीस्थळी श्री संत गाडगे बाबांचा ६० वा पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आठ दिवस येथे भरगच्छ कार्यक्रमाचे व बाबांच्या जीवन कार्यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी गाडगेनगर, राधानगर, प्रेरणा कॉलनी, संजीवनी कॉलनीतून बाबांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी मुलांनी गाडगेबाबांची वेशभुषा साकारुन हातात खराटा घेतल्याने अनेकांचे लक्ष वेधले. यावेळी लक्ष्मण महाराज काळे यांचे काल्याचे किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. प्राचार्य अरविंद देशमुख यांचेही व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. गाडगेबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्य येथे भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेत नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. (प्रतिनिधी) शिवाजी कुचे यांचे इंग्रजीत मार्गदर्शन जेष्ठ समाजसेवक तथा इंग्रजीचे शिक्षक शिवाजी कुचे यांचे गाडगेबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्य ‘इंग्लिश विषयाचे महत्व व त्यांचे आपल्या जीवनातील स्थान’ या विषयावर मंगळवारी व्याख्यान पार पडले. त्यांनी गाडगेबाबांच्या कार्यावरही विविध दाखले देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांनी आई- वडीलांची सेवा केली पाहिजे व गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर त्यांनी इंग्रजीतून आपले मत व्यक्त केले. यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते.