समस्या : प्रलंबित वेतनासह मागण्या पूर्ण करण्याची मागणीअमरावती : संपूर्ण देशात ई-पंचायत प्रकल्पामध्ये महाराष्ट्राला सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक ठेवणारे राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये संग्राम कक्ष अंतर्गत काम करणारे संगणक परिचालक हे विविध मागण्यासंदर्भात २३ मार्चपासून राज्यभरात आंदोलन करत आहे. आंदोलनात २७ हजार संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनात म्हटले की, ३१ मार्च १५ ला संगणक कक्ष चालवणाऱ्या महाआॅनलाईन कंपनीचा करार समाप्त झाला. राज्य शासनाने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाहीत. आम्ही आमच्या मागण्या न्याय मिळण्यासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन, मोर्चा व आमरण उपोषणे केलीत. त्या दरम्यान ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन संघटनेला विचारात घेतले जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते. पण, अद्यापपर्यंत कोणताच विचार झाला नाही. उलट शासन संगणक परिचालकांबाबत उदासीनता दाखवत आहे. या गोष्टींचा फायदा घेत संबंधित कंपनीचे संगणक परिचालक अन्याय करीत आहे. तसेच आजपर्यंत कंपनीचे संचालक परिचालकांनी माहे आॅक्टोबर २०१४ पासून आजपर्यंतचे मानधन दिले नाही. संगणक परिचालकांवर व त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिवाचे पत्र असतानाही राज्यातील काही संगणक परिचालकांना अद्याप कामावर घेतले नाही. महाआॅनलाईनचा करार रद्द करून संगणक परिचालकांना शासन सेवेत घेणे, प्रकल्पाच्या सुरुवातीपासून मार्च २०१५ अखेरपर्यंत थकित असलेले संगणक परिचालकांना जाचक असलेली आॅर्डर रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर संगणक परिचालक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)संगणक परिचालकांच्या मागण्या शासन व प्रशासन स्तरावर सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र याची दखल घेतली जात नसल्याने आंदोलन करावे लागत आहे- अमोल वाडी, कार्याध्यक्ष संगणक परिचालक संटघना.
संगणक परिचालकांचे कामबंद, ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प
By admin | Updated: April 11, 2015 00:20 IST