शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण पाणीपुरवठा योजनेला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 22:16 IST

पाणीपुरवठा योजनेतील सात कोटी रुपयांची कामे झालेली नसताना, ती योजना पूर्ण झाल्याची बतावणी करून त्याबाबत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र पाठविण्यात आले. सबब, पालिका प्रशासनाने शासनाची दिशाभूल केल्याची तक्रार नगरसेविका शोभा मुगल यांनी नगर प्रशासन संचालनालयाच्या आयुक्तांकडे केली आहे.

ठळक मुद्देअचलपूर नगर पालिकेकडून दिशाभूलनगरसेविका शोभा मुगल यांची तक्रार

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : पाणीपुरवठा योजनेतील सात कोटी रुपयांची कामे झालेली नसताना, ती योजना पूर्ण झाल्याची बतावणी करून त्याबाबत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र पाठविण्यात आले. सबब, पालिका प्रशासनाने शासनाची दिशाभूल केल्याची तक्रार नगरसेविका शोभा मुगल यांनी नगर प्रशासन संचालनालयाच्या आयुक्तांकडे केली आहे.केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक विकास योजनेंतर्गत सन २००६ मध्ये नगरपालिकेला जवळपास ४० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. त्यामध्ये ३७ कोटी ५० लाख रुपये शासनाने मंजूर केले, तर उर्वरित रक्कम नगर परिषद निधीमधून खर्च करणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता कर्मचारी निवासस्थान, पाण्याच्या टाकीला आवारभिंत, देवगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारभिंतीवर या योजनेतील निधी खर्च करण्यात आला, अशी तक्रार मुगल यांनी केली आहे. परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या चंद्रभागा प्रकल्पावरील ही पाणीपुरवठा योजना सुरुवातीपासूनच भ्रष्टाचाराने पोखरल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत.यवतमाळ, वाशिमच्या अभियंत्यांकडून चौकशीकोट्यवधी रुपयांची पाणीपुरवठा योजना अपूर्ण असताना पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मार्च २०१८ मध्ये देण्याचा खटाटोप पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी का केला, हे अनुत्तरित आहे. माहितीच्या अधिकारात अपीलमध्ये गेल्यानंतरच नगरसेविका शोभा मुगल यांना नगरपालिकेने पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले.दुसरीकडे डीएमएकडे केलेल्या तक्रारीनंतर यवतमाळ येथील नगर अभियंता महेश जोशी व वाशिम येथील प्रफुल्ल सोनवणे यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यांनी गत आठवड्यात दोन वेळा भेटी देऊन चौकशी केली. तेव्हा एक्स्प्रेस फीडरसह इतर कामे आढळून आली नसल्याची माहिती आहे.सात कोटींचा वाढीव निधी; कामे अपूर्णचशासनाने यूआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत काही अपूर्ण कामे करण्यासाठी जवळपास सात कोटी रुपयांचे पूरक वाढीव अनुदान नगर परिषदेला दिले. मात्र, नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून योजनेतील कामे पूर्ण झाल्याचे कागदोपत्रीच दाखविले. या कामाचे मूळ अंदाजपत्रक मजीप्राने तयार केले होते. त्यास तांत्रिक मंजुरी प्रदान करण्यात आली होती. त्यानुसार वाढीव निधीमधून जलशुद्धीकरण एक्स्प्रेस फीडर, एरिया लायटिंग लावणे, बंधाऱ्यापासून जलशुद्धीकरणापर्यंत पाइप लाइन टाकणे, बंधाºयावर मोटर पंप बसविणे आदी कामे करणे बंधनकारक असताना, ती करण्यात आली नाही. यात अपहार झाल्याचे तक्रारीत नमूद असून, प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे