शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

वित्त विभागाच्या मनमानी कारभाराची विभागीय आयुक्तांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 21:56 IST

जिल्हा परिषद अध्यक्षांनी बोलाविलेल्या १४ सप्टेंबर बैठकीत मुख्यलेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले हे अनुउपस्थितीत राहिल्याने ही सोमवारी बोलविली होती.तसेच पत्रही वित्त अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु, या दोन्ही बैठकीत ते उपस्थित नव्हते. त्यामुळे अध्यक्षांच्या पत्राला केराची टोपली दाखविणाऱ्या वित्त विभागातील मनमानी कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी तक्रार १७ सप्टेंबर रोजी झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणेंसह पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा आक्षेप, आढावा बैठकीला दांडी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद अध्यक्षांनी बोलाविलेल्या १४ सप्टेंबर बैठकीत मुख्यलेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले हे अनुउपस्थितीत राहिल्याने ही सोमवारी बोलविली होती.तसेच पत्रही वित्त अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु, या दोन्ही बैठकीत ते उपस्थित नव्हते. त्यामुळे अध्यक्षांच्या पत्राला केराची टोपली दाखविणाऱ्या वित्त विभागातील मनमानी कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी तक्रार १७ सप्टेंबर रोजी झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणेंसह पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली.१४ सप्टेंबरच्या सभेला कॅफो आजारी रजेवर होते. त्यामुळे ही बैठक पुन्हा सोमवारी घेण्याबाबतचे पत्र १४ सप्टेंबरला वित्त विभागाला दिले होते. नियोजित बैठकीला अध्यक्ष पोहोचले. मात्र, कॅफो येवले हे अचानक दौºयावर निघून गेले. त्यामुळे अध्यक्षांनी भ्रमनध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी मला उर्मट उत्तर दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. वित्त विभागाशी संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने ही बैठक बोलविली होती. मात्र, जबाबदार अधिकारीच नसल्याने ही सभा बारगळली. वित्त विभागाच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील विकास कामे ठप्प झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.काय आहेत तक्रारीत मुद्देकॅफोकडे कुठलीही नस्ती गेल्यास त्यांची आवक-जावकमध्ये नोंद होत नाही. त्रुटीची पूर्तता करून त्या सात दिवसांत निकाली न काढता त्या फायली महिनोगिणती धूळखात पडून राहतात. दरमहा विभागनिहाय योजनावरील तरतूद, शिल्लक रक्कम, चालू व गतवर्षाच्या खर्चाचा आढावा वित्त विभागाकडून घेतला जात नाही. मासिक खर्चाचा अहवाल विषय समिती, स्थायी समिती व आमसभेत ठेवला जात नाही. विभागनिहाय लेखा आक्षेप निकाली काढण्यासाठी खातेप्रमुखांची बैठक घेऊन अनुपाल केले जात नाही.व महत्वाचे लेखा आक्षेप तपासले जात नाहीत. मागील वर्षीचा खर्च तपासून खाते निहाय व पंचायत समिती निहाय शिल्लक रक्कम व चालू तरतूद बाबत आगामी लोकसभा,विधानसभेची निवडणूकीची आचारसंहीता लक्षात घेता. पुरवणी अर्थसंकल्प तयार करून मान्यतेसाठी विषय समिती,स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत ठेवला नाही.कुठल्याही कामांची देयके अदा करतांना सर्व कागदपत्रांची तपासणी केली जात नाही असे जवळपास दहा मुद्याचा यातक्रारीत समावेश आहे.या पत्रावर अध्यक्ष नितीन गोंडाणे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे,सभापती बळवंत वानखडे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.पहिल्या बैठकीला आजारी रजेवर होतो. सोमवारी नियोजित तिवसा दौºयावर होतो. सहकाऱ्यांना बैठकीची माहिती दिली होती. नियमानुसार कामे न केल्याने राजकीय दबाव आणून बदनामीचे हे षड्यंत्र आहे. धमक्या दिल्याचे पुरावे आहेत.- रवींद्र येवले, कॅफो, जि.प.वित्त अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक फायली रोखल्या जातात. यासंदर्भात ही बैठक बोलविली होती. या दोन्ही बैठकीला कॅफो गैरहजर होते. त्यामुळे या विभागाच्या चौकशीसाठीची तक्रार आयुक्तांकडे केली आहे. केलेले आरोपात तथ्यहीन आहे.- नितीन गोंडाणे, अध्यक्ष, जि.प.