शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

दुय्यम निबंधकाविरुद्ध वृद्धाची तक्रार

By admin | Updated: February 5, 2016 00:20 IST

तहसीलदारांच्या परवानगीनंतरही जमिनीची खरेदी करून देण्यास सहायक दुय्यम निबंधकांनी मानसिक त्रास दिला.

अचलपुरातील प्रकार : प्रकरण एसीबीकडे वर्गसुनील देशपांडे अचलपूर तहसीलदारांच्या परवानगीनंतरही जमिनीची खरेदी करून देण्यास सहायक दुय्यम निबंधकांनी मानसिक त्रास दिला. तसेच खरेदीनंतर दहा हजार रुपयांची मागणी केली आणि धमकीही दिल्याची तक्रार वयोवृद्ध शेतकऱ्याने अचलपूर ठाण्यात केली. अचलपूर येथील सहायक दुय्यम निबंधक काही ना काही कारणावरून वादग्रस्त ठरतात. याबाबत अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथील वयोवृद्ध काशीनाथ रामकृष्ण तिडके (८८) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तहसीलदारांनी ७ डिसेंबर २०१५ रोजी सहनिबंधकांना पथ्रोट येथील गट नं. १६/२ क्षेत्रफळ तिडके यांचे नावानी करून देण्यास कळविले. त्यानुसार १५ डिसेंबर रोजी निबंधकांच्या कार्यालयात गेले असता त्यांनी जिरायती व तुकडा जमीन असल्यामुळे खरेदी होत नाही, तहसीलदारांना विचारून कळवितो, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी ते तेथे गेले असता त्यांनी तेच उत्तर दिले. त्यामुळे वृद्धाने तहसीलदारांची भेट घेतली. त्यांनी निबंधकांना खरेदी करून देण्यास सांगितले. मात्र निबंधक अर्जुन बडधे यांनी एजंटामार्फत पैशाची मागणी केली. वृद्धाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर १८ डिसेंबर रोजी सायंकाळी वृद्धाच्या भ्रमणध्वनीवर फोन करून बडधे यांनी त्यांना धमकावले, असेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे निबंधक बडधे यांचेवर कडक कारवाई करावी, असेही तिडके यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची पोलिसांनी चौकशी सुरू केल्याने हे प्रकरण उघड झाले आहे.