शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
5
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
6
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
7
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
8
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
9
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
10
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
11
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
12
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
13
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
14
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
15
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
16
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
17
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
18
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
19
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

विभागीय वनअधिकाऱ्याविरुद्ध सहायक वनसंरक्षकाची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 18:46 IST

पाकीट प्रकरणाला वेगळे वळण : मोबाइलचे सीडीआरसह सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी

अनिल कडू/परतवाडा (अमरावती) : विभागीय वनअधिकाऱ्याविरुद्ध सहायक वनसंरक्षकांनी मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार केल्यामुळे वनविभागात खळबळ उडाली आहे. यात पाकीट प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून, विभागीय  वनअधिकाऱ्याच्या मोबाइलचे सीडीआर मागविण्यासह सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी सहायक वनसंरक्षकांनी केली आहे.

विभागीय वनअधिकारी (योजना) सैफन शेख यांच्याविरुद्ध मेळघाट प्रादेशिक वनविभाग (परतवाडा) अंतर्गत धारणी येथील सहायक वनसंरक्षक एस.एस. कोलनकर यांनी ही तक्रार मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) अमरावती यांच्याकडे केली आहे.विभागीय वनअधिकारी सैफन शेख वनविभागातील कामांकरिता संबंधित अधिकाºयांना अनुदान (निधी) वितरित करतात. विविध कामांच्या अनुषंगाने वितरित केलेल्या शासकीय अनुदानात त्यांना आपला हिस्सा (वाटा) हवा आहे. मार्च एन्डचा वाटा, पाकीट मिळाले नाही म्हणून ते आरएफओंना भेटायला बोलावतात. यात सहायक वनसंरक्षकांनाही सहकार्य करायला लावतात. ते भ्रष्टाचार करण्यास प्रवृत्त करतात. ते भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे आहेत, असे एस.एस. कोलनकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

सहायक वनसंरक्षक एस.एस. कोलनकर यांनी आपली ही तीन पानांची तक्रार १६ दिवसांपूर्वी धारणी स्थित स्वत:च्या कार्यालयातून सवस/धारणी/१६/२०१९-२० अन्वये मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्याकडे पाठविली आहे. यात त्यांनी २६ एप्रिल आणि ३० एप्रिल २०१९ या दोन दिवसांत घटनांचा घडलेल्या प्रकाराचा ऊहापोह केला आहे, तर घडलेला प्रकार त्याच दिवशी भ्रमणध्वनीवरून मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या कानावरही त्यांनी टाकला आहे.असंवैधानिक कृत्य/असभ्य भाषाविभागीय वनअधिकारी शेख यांनी ३० एप्रिलला स्वत: केबिनमध्ये बोलावून माझ्या दिशेने टेबलपर एक पाकीट फेकले. तुम्ही आणि तुमचे आरएफओ भिकारचोट आहेत. तुमच्याकडून मला काहीही मिळाले नाही. पण, मीच माझ्याकडून तुम्हाला मार्च एन्डचे पैशाचे पाकीट देत आहे, अशी भाषा वापरून माझा व माझ्या अधिनस्त असलेल्या आरएफओंचा अपमान केल्याचे कोलनकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.मोबाइल सीडीआरविभागीय वनअधिकारी सैफन शेख यांच्यासह स्वत:चा मोबाइल नंबर देत या मोबाइलचा सीडीआर मागवण्यात यावा. एकूण ५ मिनिटे २६ सेकंद झालेल्या संभाषणात शेख काय बोलले, याचाही उल्लेख कोलनकर यांनी तक्रारीत केला आहे. या सीडीआरसह सीसीटीव्ही फुटेजही तपासण्याची मागणीही कोलनकर यांनी केली आहे. या तक्रारीची प्रत त्यांनी उपवनसंरक्षक (मेळघाट प्रादेशिक वनविभाग, परतवाडा) यांनाही दिली आहे.

तक्रार अधिकृतपणे माझ्याकडे आलेली नाही. तक्रारीत नमूद प्रकार घडलेला नाही. कुठलेही असंवैधानिक कृत्य, असभ्य भाषा मी वापरलेली नाही. स्वत:च्या बचावाकरिता खोटे आरोप त्यांनी केले असावेत. प्रशासकीय वातावरण गढूळ करण्याचा हा प्रयत्न आहे.- सैफन शेख, विभागीय वनअधिकारी (योजना), अमरावती