शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपवर नोंदविता येणार स्वच्छतेविषयक तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 23:00 IST

गटर साफ नाही, कचरा उचलला नाही यांसारख्या तक्रारी करण्यासाठी आता महापालिकेत जाण्याची गरज नाही, तर स्वत:च्या मोबाइलवर क्षणात याची तक्रार करता येणार आहे. नगर विकास विभागाने एमओएचयूए अ‍ॅप विकसित केले आहे. ही नागरिकांसाठी मोठी उपलब्धी आहे. ही केंद्र शासनाची प्रणाली असल्याने तक्रारीचा निपटारा विहित कालावधीत करणे प्रशासनाही बंधनकारक आहे.

ठळक मुद्देनागरिकांसाठी उपलब्धी : नगर विकासने विकसित केले स्वच्छता एम.ओ.एच.यू.ए. अ‍ॅप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गटर साफ नाही, कचरा उचलला नाही यांसारख्या तक्रारी करण्यासाठी आता महापालिकेत जाण्याची गरज नाही, तर स्वत:च्या मोबाइलवर क्षणात याची तक्रार करता येणार आहे. नगर विकास विभागाने एमओएचयूए अ‍ॅप विकसित केले आहे. ही नागरिकांसाठी मोठी उपलब्धी आहे. ही केंद्र शासनाची प्रणाली असल्याने तक्रारीचा निपटारा विहित कालावधीत करणे प्रशासनाही बंधनकारक आहे.शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची तेवढीच नागरिकांची आहे. गटार साफ नाही, कचरा उचलला नाही, सार्वजनिक शौचालय साफ नाही, अशा प्रकारच्या अनेक तक्रारींसाठी आता नागरिकांना महानगरपालिकेत जाण्याची गरज नाही. ही गैरसोय दूर होऊन तक्रार नोंदवणे आता अगदी सोपे झाले आहे. प्रत्येक नागरिक स्मार्ट फोनच्या साहाय्याने अगदी कुठूनही, क्षणार्धात विनासायास तक्रार नोंदवू शकतो.महानगरपालिकेच्या संबंधित कार्यालयाकडे ही तक्रार जाईल आणि तेथून संबंधित क्षेत्राच्या जबाबदार कर्मचाऱ्याकडे तात्काळ पाठविली जाईल. तोच कर्मचारी तक्रार निवारण करून, तक्रार असलेल्या जागेचा फोटो काढेल व पोस्ट करेल आणि तो संबंधित नागरिकांससुद्धा तात्काळ दिसेल. नागरिकांच्या स्वच्छतेच्या संदर्भातील तक्रारींचा निपटारा स्वच्छता अ‍ॅपद्वारे होऊ शकणार असल्याने शहर स्वच्छतेबाबत ही मोठी उपलब्धी ठरणार आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.अशी करता येईल तक्रारकेंद्र शासनाच्या नगरविकास खात्याने स्वच्छता एम.ओ.एच.यू.ए. अ‍ॅप विकसित केले आहे, जे वापरण्यास अगदी सुलभ आहे. मोबाइलमधील प्ले स्टोअरवर क्लिक करून स्वच्छता एम.ओ.एच.यू.ए. अ‍ॅप डाऊनलोड करा. त्यानंतर पसंतीची भाषा निवडून अ‍ॅप आपला मोबाइल नंबर मागेल त्या योग्य जागी नमूद करा. तुम्हाला लगेच ओ.टी.पी. मिळेल. त्यानंतर पहिली तक्रार पोस्ट करा व क्लिक करा.अस्वच्छतेचा फोटोही पाठविता येणारअस्वच्छतेबाबत जी तक्रार नोंदवायची आहे, त्या जागेचा फोटो काढा. सर्वसाधारणपणे आढळणाºया तक्रारी, जसे मृत प्राणी, कचºयाचा ढीग, कचरागाडी आली नाही, यातील जी तक्रार लागू असेल, त्यावर क्लिक करा. नंतर त्या परिसरातील स्थळ व क्लिक करा.नागरिकांनी जास्तीत जास्त स्वच्छता एम.ओ.एच.यू.ए. अ‍ॅप डाऊनलोड करून रजिस्ट्रेशन करा. तक्रारीवर समाधान झाल्यास लाईक करा. स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभागी व्हावे.- संजय निपाणे, आयुक्त, महापालिका