प्रतिष्ठान सील : आकस्मिक कारवाईचा निषेध अमरावती : स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरण्याची महापालिकेकडून केली जात असलेल्या सक्तीच्या विरोधात गुरूवारी येथील तखतमल इस्टेट व्यापारी संकुलातील व्यावसायिकांनी प्रतिष्ठाने बंद केली. व्यावसायिकांनी अचानक घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. कारवाईच्या निषेधार्थ दिवसभर दुकाने बंद ठेवण्यात आली. येथील जयस्तंभ चौकालगतच्या तखतमल इस्टेटमधील संस्कृती साडी सेंटरने एलबीटीचा भरणा न केल्याच्या पार्श्वभूमिवर कमलेश पिंजानी व प्रकाश पिंजानी यांच्या नावे ५ वेळा प्रशासनाने नोटीस बजावल्या. कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने १ एप्रिल रोजी एलबीटी विभागाने १0 हजार रूपयांच्या मागणीची नोटीस बजावली. या नोटीसला सुध्दा पिंजानी बंधुंनी प्ररिसाद दिला नाही. अखेर गुरूवारी आयुक्त अरूण डोंगरे यांच्या आदेशानुसार ‘संस्कृती साडी’ हे प्रतिष्ठान सील करण्याची कारवाई करण्यात आली. त्यानंतर एलबीटी महसूल रक्षणार्थ तपासणी व जप्तीचे आदेश जारी करण्यात आले. मात्र, ही कारवाई दडपशाहीने होत असल्याचा आरोप करीत व्यावसायिकांनी प्रतिष्ठाने बंद केली. ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. जप्ती कारवाई दरम्यान उपायुक्त रामदास सिध्दभट्टी, एलबीटी निरिक्षक योगेश पिठे, अधिक्षक सुनील पकडे, रितेश देसाई, दुर्गादास मिसाळ, श्रीराम आगाशे, राजू वाठोळकर, रूपेश गोलाईत, कमल देसाई, अजय राठोड, स्वप्नील रामशे, प्रदीप झंझाड,प्रशांत राऊत, माहुलकर आदी उपस्थित होते. दुकान सील करण्यापूर्वी प्रशासनाने दंड भरण्याचा अवधी दिला नाही, असे पिंजानी बंधुंचे म्हणणे आहे. परंतु प्रशासनाने वारंवार संधी दिली, तरीदेखील एलबीटी भरण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाने जप्तीची कारवाई केली, असे जकात विभाग प्रमुख सुनील पकडे यांनी
एलबीटी सक्तीविरोधात व्यावसायिकांचा बंद
By admin | Updated: May 15, 2014 23:03 IST