आज संगीत नृत्य : मनोरंजनाची मस्ती भरी झलक दिखला जाअमरावती : पहिला पाऊस पडून गेलेला आहे. निसर्गाने हिरवाकंच शालू पांघरला आहे. धरणीमाता पावसाने चिंब झाली आहे. रसिकतेला आव्हान देणाऱ्या रोमँटिक वातावरणात हळूच सुरेल तान कानावर पडावी. मन बेभान होऊन नाचू गाऊ लागावं असं वाटत असतं. नेमका या वातावरणाचा मूड ओळखून आपल्या असंख्य प्रेक्षकांच्या मनातील भाव ओळखून पुन्हा एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच रविवारी घेऊन येत आहे -रिमझिम गाणी झलक सुहानी.गोवा आणि महाराष्ट्रात ज्याप्रमाणे लोकमत सखी मंचने आपल्या सदस्यांसाठी चौफेर कार्यक्रम देवून त्यांच्या मनात घर केलं आहे. त्याचप्रमाणे कलर्सने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या कार्यक्रमाच्या स्वरूपात पुन्हा एकदा कलर्स व लोकमत सखी मंच आपल्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमात असणार आहे आपल्या मनातील गाणी, आपल्या आवडीची पाऊस गाणी आणि सोबतच नृत्याची झलक दिखला जा स्पर्धा - नृत्यस्पर्धेत केवळ १० स्पर्धकांना प्रवेश घेता येणार असून या स्पर्धेत नृत्य कौशल्याचा कस लागणार आहे.पुन्हा एकदा कलर्स चॅनेलवर ३० जुलै २०१६ पासून शनिवारी रात्री १० वाजता झलक दिखला जा हॉट है सुरू होणार आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे २००६ ची मिस युनिव्हर्स श्रीलंका आणि सुप्रसिद्ध मॉडल जॅकलीन फर्नांडिस सेलीब्रेटी जज आहे. याशिवाय सुप्रसिद्ध फिल्म निर्देशक करण जौहर, सुप्रसिद्ध कोरीओग्राफर गणेश हेगडे हे सुद्धा परिक्षकांच्या भूमिकेत धमाल करणार आहे.एकूण १२ सेलीब्रेटी या झलक दिखला जा हॉट है यामध्ये सहभागी होणार आहे. ज्यात सुर्वीन चावला, करिश्मा तन्ना, शक्ती अरोरा, अर्जुन बिजलानी, गौरव गेरा (चुटकी फेम), पुनम शहा, प्रियंका शहा (जुळ्या बहिणी), हरपाल सिंग सोखी (शेफ), हेली शाह, नोरा फतेही, सलमान युसुफ खान, सिद्धांत गुप्ता आणि शांतनु माहेश्वरी असे १० नामवंत प्रख्यात सेलीब्रेटी या 'शो'चे आकर्षण आहे. पण जॅकलीन फर्नांडिसच्या सहभागाने या 'शो'ला एक ग्लॅमरस आणि सिझनिंग स्वरूप आले आहे. जे या शोचे वैशिष्ट्य आहे. तेव्हा पावसाच्या गाण्यासोबत, कर्णमधुर संगीतासोबत, नृत्याच्या दिलखुलास ठेक्यासोबत झलक दिखला जा चे स्वागत करू या.त्यामुळे या कार्यक्रमाचा एक वेगळा कलर आम्ही घेऊन येत आहोत ज्यात असणार आहे डान्स मस्ती मनोरंजन आणि धमाल - हा कार्यक्रम २४ जुलै, अभियंता हॉल, शेगाव नाका चौक, व्ही.एम.व्ही. रोड,अमरावती येथे सायंकाळी ५ वाजता होणार असून कार्यक्रम बघण्याकरिता संपर्क करा - प्रथम येणाऱ्या सखींना प्रवेश मिळणार असून डान्स स्पर्धेसाठी नोंदणी लवकर करावी. अधिक माहितीसाठी संपर्क लोकमत भवन विभागीय क्रिडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती ९८५०३०४०८७, ७३८७६७५६८५.
कलर्स प्रस्तुत सखी मंच रिमझिम गाणी झलक सुहानी
By admin | Updated: July 24, 2016 00:13 IST