शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

मेळघाटात आढळले ‘कलरफूल’ बेडूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 16:06 IST

मेळघाटातील जंगलात रंगीत बेडूक आढळून आले आहे. हे दुर्मीळ रंगीत बेडूक ‘पेंटेड कलुओला’ या नावाने नोंदले गेले आहे.

ठळक मुद्देसंपन्न जैवविविधता अधोरेखित१६ प्रजातींची नोंद

अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील जंगलात रंगीत बेडूक आढळून आले आहे. हे रंगीत बेडूक ‘पेंटेड कलुओला’ या नावाने नोंदले गेले आहे. थंड हवामानाच्या अधिवासात हे बेडूक आढळते. मोठ्या झाडांच्या खोडातील पोकळीत ते राहते. मेळघाटातील चिखलदऱ्याकडील जंगलात याची प्रथमच नोंद घेण्यात आली आहे. बेडकांच्या १६ प्र्रजातींच्या नोंदीमुळे मेळघाटातील संपन्न जैवविविधता पुन्हा एकदा आधोरेखित झाली आहे.परतवाडा आणि अंजनगाव सुर्जी भागात याआधी हे रंगीत बेडूक आढळले असले तरी ते मेळघाटामधील लाकडांसोबत, लाकडाच्या ढोलीतून तेथे आल्याचा दावा संशोधक तथा अमरावती स्थित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक गजानन वाघ यांनी केला. हे बेडूक केवळ अन् केवळ मोठ्या झाडांच्या खोडामधील पोकळीतच वास्तव्यास असतात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या बेडकाच्या अंगावर आकर्षक असे लाल, निळे, पिवळ्या रंगाचे ठिपके बघायला मिळतात. त्यांची ठेवण आकर्षक असून, शरीर फुगीर असते. यावरून त्यास ‘कलर बलून फ्रॉग’ही म्हटले जाते. मेळघाटात २००५ मध्ये झुलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाचे शास्त्रज्ञ सतीश कांबळे यांनी बेडकांच्या आठ प्रजातींची नोंद घेतली. यानंतर २०१६ मध्ये गजानन वाघ यांनी आणखी नव्या तीन प्रजातींची नोंद घेतली. या बेडकांच्या ११ प्रजातींच्या नोंदीसंबंधी गजानन वाघ यांचा शोधनिबंधही २०१७ मध्ये प्रकाशित झाला.आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशनगजानन वाघ यांच्या मार्गदर्शनात हयात कुरेशी यांनी मेळघाटातील वेगवेगळ्या अधिवासाचा अभ्यास करीत २०१७ ते २०१९ या काळात बेडकांच्या आणखी पाच नव्या प्रजातींची नोंद घेतली फर्ग्युसन टोड, हिलक्रिकेट फ्रॉग, मलबार वार्ट फ्रॉग, मार्बल्ड सँंड फ्रॉग, पेंटेड कलुओला, डोबसॉस बॉरोविंग फ्रॉग या सहा प्रजातींची व त्यांच्या सूक्ष्म अधिवासाची नोंद प्रथमच कुरेशी आणि गजानन वाघ यांच्याकडून मेळघाटात घेण्यात आली आहे. मेळघाटातील बेडकांचे ते अभ्यासक ठरले आहेत, तर आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये १ ऑगस्ट २०२० ला या दोघांचाही शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.मेळघाटात बेडकांच्या आणखी नव्या प्रजातींची नोंद होऊ शकते. त्याकरिता दीर्घकाळ अभ्यास व संशोधन करण्याची गरज आहे. मेळघाट दुर्मीळ अशा रंगीत (कलर) बेडकाची पेंटेड कलुओला या नावाने नोंद घेण्यात आली आहे.गजानन वाघ,जैवविविधता अभ्यासक

टॅग्स :wildlifeवन्यजीव