शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

जिल्हाधिकारी परतवाड्यात यंत्रणा ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 05:01 IST

जिल्हाधिकारी शैलेश नवाल २० फेब्रुवारी रोजी सकाळी परतवाड्यात दाखल झाले. बाजारपेठेसह सदर बाजार आणि ज्या परिसरात रुग्ण अधिक निघत आहेत, त्या भागाची रस्त्यावर उतरून त्यांनी पाहणी केली. या पाहणीत त्यांना कुठेही कंटेनमेंट झोन आढळून आले नाही. मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणारी पथके कार्यान्वित आहेत की नाही, याची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्थानिक प्रशासनासमवेत बैठकही घेतली.

ठळक मुद्देप्रशासन लागले धावायला, परतवाडा कांडली, देवमाळीत कंटेनमेंट झोन

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघून शनिवारी जिल्हाधिकारी स्वत: परतवाड्यात पोहोचले.  जिल्हाधिकाऱ्यांना  ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये बघून स्थानिक प्रशासन अक्षरश: धावायला लागले.जिल्हाधिकारी शैलेश नवाल २० फेब्रुवारी रोजी सकाळी परतवाड्यात दाखल झाले. बाजारपेठेसह सदर बाजार आणि ज्या परिसरात रुग्ण अधिक निघत आहेत, त्या भागाची रस्त्यावर उतरून त्यांनी पाहणी केली. या पाहणीत त्यांना कुठेही कंटेनमेंट झोन आढळून आले नाही. मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणारी पथके कार्यान्वित आहेत की नाही, याची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्थानिक प्रशासनासमवेत बैठकही घेतली. यात त्यांनी कंटेनमेंट झोन जाहीर करून कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले. सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरणासह कोरोना त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करीत प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी स्थानिक प्रशसनाला दिल्यात. कुटीर रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड रुग्णालयाचाही त्यांनी भेट दिली. राज्य शासनाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांच्या अचलपूर दौºयानंतर जिल्हाधिकारी शैलेश नवाल, विभागीय आयुक्त पीयूष सिंह अचलपूरच्या अनुषंगाने ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आले आहेत. दरम्यान, डॉ. साळुंके यांच्या नंतर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ. दीपक म्हैसकर यांनीसुद्धा अचलपूरच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला १९ फेब्रुवारीला सक्त निर्देश दिले आहेत. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या हालचाली वाढल्या.

पालिका प्रशासन पोरकेअचलपूर नगरपालिका प्रशासन नियमित मुख्याधिकाऱ्यांअभावी पोरके झाले आहेत. अश्विनी वाघमळे यांच्यानंतर रुजू झालेले राजेंद्र फातले यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासनाचा अतिरिक्त प्रभार दिला गेला. त्यांचे वास्तव्य अमरावतीत आहे. ते अतिरिक्त प्रभारातच रमले. त्यातच एक आठवड्यापूर्वी त्यांचा अमरावतीला अपघात झाला आणि ते रजेवर गेले. दरम्यान, कोरोना रुग्णसंख्येमुळे अचलपूर हॉटस्पॉट बनले असतांनाही ना कंटेनमेंट झोन, ना निर्जंतुकीकरण, निर्णय कुणी घ्यावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोचिंग क्लासेसवर कारवाईपरतवाडा शहरातील दोन कोचिंग क्लासवर कारवाई करीत नगरपालिका पथकाने दंड ठोठावला. दोन हॉटेलवरही त्यांनी दंडात्मक कारवाई केली असून, तर मंगल कार्यालयाला पथकाच्या नियमित भेटी सुरू आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी