शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

वरुड येथे पाच हजार रक्तपिशव्यांचे संकलन

By admin | Updated: December 17, 2015 00:26 IST

लोकसेवा : ग्रामीण रूग्णालय संलग्न रक्तदाता संघाने वाचविले अनेकांचे प्राण

लोकसेवा : ग्रामीण रूग्णालय संलग्न रक्तदाता संघाने वाचविले अनेकांचे प्राण वरुड : गोरगरीब रुग्णांची रक्तासाठी ससेहोलपट होत असल्याने १ जानेवारी २०१५ ला ग्रामीण रुग्णालयामार्फत रक्तदाता संघ स्थापन केला. या संघाने वर्षभरात तब्बल ८५ रक्तदान शिबिरे आयोजित करून पाच हजार एक रक्तपिशव्या संकलित केल्या आहेत. रक्तदाता संघांतर्गत गरजू आणि गोरगरीब रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करुन शेकडो रुग्णांचे प्राण वाचविले. मोफत रक्तपुरवठा करणारा वरुडचा रक्तदाता संघ राज्यात अव्वल ठरला आहे.रक्ताची प्रत्येकाला गरज भासते. परंतु मानवाने मोफत रक्तदान करुन दिलेले रक्त रुग्णांना विकत घ्यावे लागते. गोरगरीबांना आर्थिक अडचणीमुळे रक्त विकत घेणे शक्य होत नव्हते. केवळ रक्तामुळे अनेकांचे प्राण गेले. जीवन अनमोल असल्याने मानवाचे प्राण वाचले पाहिजे आणि मोफत रक्तपुरवठा झाला पाहिजे, या दृष्टीने वरुडच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार यांनी सामाजिक कार्यकर्त्यांसोबत या समस्येबाबत चर्चा केली. त्यानंतर १ जानेवारी २०१५ रोजी वरुडमध्ये ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघाची स्थापना केली. जानेवारीपासून डिसेंबर २०१५ पर्यंत ८५ रक्तदान शिबिरे घेवून पाच हजार एक रक्तपिशव्यांचे संकलन केले. या रक्तदाता संघाने नागपूर, अमरावती वरुड, मोर्शी तालुक्यातील रुग्णांना रक्तपुरवठा करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाची रक्तपेढी तसेच नागपूरच्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सहकायाने हा उपक्रम सुरु केला. दोन्ही रक्तपेढी अंतर्गत शासन निर्णयानुसार आणि शासनाच्या अटी व नियंमाना अधिन राहून मोफत रक्तपुरवठा करण्यात येतो. रक्तदानासाठी सेवाभावी विविध संस्था, मंडळे , शासकिय कार्यालये, राजकिय पक्ष, संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळत आहे. या माध्यमातून शिबिरांचे आयोजन करुन रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करण्याची संकल्पना सुरु केली. सेवाभावी रक्तदात्यांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला. या रक्तदाता संघामार्फत संकलित केलेले रक्त जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पुरविण्यात येते. यामुळे आजवर अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होते. या स्तुत्य उपक्रमाची अनेकांनी दखल घेऊन या कार्यात सहकार्य केले आहे. रक्तदाता संघ वरुडने नागपूरच्या कोणत्याही रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांसाठी मोफत रक्तपुरवठयाची सोय व्हावी म्हणून नागपूरच्या हेडगेवार रक्तपेढीसोबत लेखी करार केला आहे. या माध्यमातून नागपुरात सुध्दा मोफत रक्ताची सुविधा उपलब्ध केली आहे. जिल्हयात एकमेव मोफत रक्तपुरवठा करण्याचा संकल्प करणारी सेवाभावी संस्था म्हणून या रक्तदाता संघाने उत्तुंग भरारी घेतली आहे. या रक्तदाता संघाला राजाश्रयाची गरज असून शासनकर्त्यांनी सुध्दा सहकार्य केल्यास वरुडला शासकीय रक्तपेढी स्थापन होऊ शकते. ही उणीव भरुन काढण्यासाठी रक्तदाता संघाच्यावतीने पालकमंत्री प्रवीण पोटे, आ.अनिल बोंडे यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघाला आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे, जिल्हा शल्य चिकित्सक राऊत, रक्तपेढीचे जाधव, सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल अमरावतीचे वैद्यकीय अधीक्षक शामसुंदर निकम, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक प्रमोद पोतदार, अशोक पत्कींसह संचालक मंडळाचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. रक्तदाता संघाच्या माध्यमातून आजवर अनेक गोरगरीब रूग्णांचे प्राण वाचले आहेत. हा प्रवास अविरत सुरू आहे. रक्तदाता संघाची उभारणी गरजू रुग्णांना मोफत रक्त देण्यासाठी करण्यात आली. मानवाचे रक्त हे केवळ ३३ दिवसच राहू शकते. चक्राकार पध्दतीने रक्तदान शिबीर आयोजित करणे गरजे असते. यासाठी रक्तदान शिबिर घेण्यासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षित असल्याने रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासाठी शासकिय कार्यालयाचे प्रमुख , सेवाभावी संस्था, उत्सव समित्या, मंडळे, सर्व जातीधर्माच्या नागरीकांनी सहकार्य करुन सहकार्य कराव े.- प्रमोद पोतदार, कोषाध्यक्ष, रक्तदाता संघ रक्तदानाविषयी जनजागृतीसाठी विवाह सोहळारक्तदानाबाबत नागरिक, तरुणांंमध्ये जनजागृती व्हावी याकरिता ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघाने गत मे महिन्यात पुसला येथे विवाह सोहळ्यात आणि जरुडला वाढदिवसात जनजागृती करण्यासाठी अमरावती येथील बियाणी महाविद्यालयात आणि बजरंग गणेश मंडळानेही रक्तदान शिबिर घेतले.