शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

६ जानेवारीला आचारसंहिता ?

By admin | Updated: January 5, 2017 00:20 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रतीक्षा आहे. आचारसंहिता कधी लागू होते, याची वाट पाहणे सुरु आहे.

झेडपीचा रणसंग्राम : नेत्यांना भूमिपूजनाची लगीनघाई अमरावती : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रतीक्षा आहे. आचारसंहिता कधी लागू होते, याची वाट पाहणे सुरु आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शासकीय निधीतून विकास कामांचे भूमिपूजन आटोपले पाहिजे, अशी घाई मंत्री, आमदारांकडून सुरु आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा ताण वाढला आहे. बहुप्रतिक्षीत आचारसंहिता ६ किंवा ७ जानेवारी रोजी लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या तारखा लक्षात घेऊन प्रशासकीय पातळीवर कामे मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहे. अमरावती जिल्हा परिषदेसाठी ५९ मतदारसंघ आहेत तर पंचायत समितीचे दुप्पट म्हणजे ११८ मतदार संघ आहेत. यापैकी सध्या ८८ ठिकाणीच निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषदेची मुदत मार्च महिन्यात संपत आहे. या मुदतीपूर्वी नवीन जिल्हा परिषद अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषदेची सर्वसामान्य सभा घेण्यात आली. ही विशेष सर्वसाधारण सभा शेवटची ठरण्याची शक्यता आहे. या सर्व साधारण सभेपासून जिल्हा परिषदेच्या बहुतां सदस्य मिनीमंत्रालयात ये-जा करणे बंद आहे. केवळ अडलेली कामे निकामी काढण्यासाठी सदस्य जिल्हा परिषदेत धाव घेत आहेत. उर्वरित सर्व वेळ आपापल्या मतदार संघाला देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य मतदारसंघातील विकासकामे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून ग्रामीण भागात विकासकामांचे भूमिपूजन सुरु आहे. आमदारांनी भूमिपूजनाचा सपाटा लावला आहे. रस्ते, नालीचे बांधकाम, डांबरीकरण, रस्त्याचे काँक्रीटीकरण आदींचे भूमिपूजन सुरु आहे. २१ जानेवारीला मतदार यादीचे प्रकाशन जिल्हा परिषदेच्या ५९ मतदर संघामध्ये १३ लाखांवर मतदार आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने मतदार यादी पुर्ननिरिक्षण कार्यक्रम राबविला. त्यामध्ये नवीन मतदारांची नोंदणी आणि घर सोडून गेलेल्या मतदारांची नावे कमी करण्यात आली. मतदारांची निवडणूकपूर्व अंतिम यादी २१ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात येत आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरणे सुरु होणार आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ६ व ७ जानेवारीला निवडणूक कार्यक्रमाची घोषणा ६ जानेवारीपूर्वी विकासकामांचे भूमिपूजन किंवा उद्घाटन कार्यक्रमांवर भर देण्यात येत आहे. तसेच सार्वत्रिक बांधकाम विभागाच्यावतीने ग्रामीण भागातील रस्त्यांची कामेदेखील ५ जानेवारीपर्यंत कार्यारंभादेशार्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाची लगबग लक्षात घेता जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रमाची घोषणा ६ किंवा ७ जानेवारी रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.