शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वाहने तोडणारे हुडकून काढण्यासाठी ‘कोम्बिंग

By admin | Updated: February 16, 2016 00:14 IST

अमरावती शहर गाड्या तोडण्याचे ‘हब’ झाले असून अशा बेलगाम व्यवसायावर लगाम कसण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन राबविण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले.

रणजित पाटील : वाहतूक नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजनेवर भर अमरावती : अमरावती शहर गाड्या तोडण्याचे ‘हब’ झाले असून अशा बेलगाम व्यवसायावर लगाम कसण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन राबविण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले. शहरातील वाहतूक व्यवस्थाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी उपस्थित आयुक्तांना त्यांनी दीर्घ उपाययोजना राबविण्याच्या सूचनासुद्धा केल्या. शाळा आणि महाविद्यालय आयडेंटीफाय करून शाळेच्या वेळेत जड वाहने तर नकोच, असे आपले मत असून जीव अधिक महत्त्वाचा आहे. नियंत्रित वाहतूक व्यवस्थेसाठी काही वळणमार्ग सुचविले आहेत. वाहतुकीची जबाबदारी निश्चित करुन भीडमुर्वत न ठेवता कारवाई करण्याचे निर्देश आपण पोलिसांना दिले आहेत. अधिक वाहतुकीची स्थळ निश्चिती करून वाहतुकीचे नियमन केले जाईल, असे ही पाटील यांनी सांगितले. राज्यात सर्वदूर वाहतकिीची समस्या सारखीच असून गृहविभागाचा मंत्री म्हणून ही समस्या सोडविण्यासाठी दीर्घकालीन योजनांचे नियोजन सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, उपायुक्त नितीन पवार हे उपस्थित होते.ट्रान्सपोर्ट नगर शहराबाहेर नागपुरीगेटच्या हद्दीत असणाऱ्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये बेफाम ट्रक वाहतूक होत असल्याचे बैठकीदरम्यान कळ्यानंतर अकोल्याप्रमाणे अमरावतीचे ट्रान्सपोर्ट नगर शहराबाहेर हलविणे शक्य आहे का? या शक्यतेवर यंत्रणेशी मंथन करुन योग्य निर्णय घेणार असल्याचे पाटील म्हणाले. पत्रपरिषदेदरम्यान गुडेवारांशी चर्चा पत्रकार परिषद सुरु असताना वाहतुकीसंदर्भात पाटील यांनी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार भ्रमणध्वनीवरुन यांच्याशी चर्चा केली. राजापेठ बसस्थानक, ट्रान्सपोर्ट नगर, सुरक्षित वाहतूक आणि महापालिकेच्या जबाबदारीबाबत पाटील यांनी गुडेवारांना निर्देश दिले. ‘सोशल रिस्पान्सबिलीटी’ महत्त्वाची वाहतूक नियमासाठी आणि अपघातमुक्त शहरासाठी ‘सोशल रिस्पान्सबिलिटी महत्त्वाची असल्याचे पाटील म्हणाले.