अमरावती : शहरात मोठ्या प्रमाणात गुटखाविक्री होत असल्याने संतापलेल्या युवा सेनेने शुक्रवारी एफडीएच्या कार्यालयात जाऊन सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांना बेशरमचे रोपटे भेट दिले. त्यांनी सहआयुक्तांच्या टेबलवर गुटखा फेकला.युवा सेनेचे राहुल माटोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. जिलाधिकाºयांनी यासंदर्भात गुरुवारी एफडीए अधिकारी व पोलीस प्रशासनाची बैठक घेऊन गुटखा विक्री करणाºयांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे फर्मान सोडले होेते. त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवीण दिधाते, स्वराज ठाकरे, शैलेश चव्हाण, मिथून सोळंके, कार्तिक गजभिये, सचिन उमक, बंडु बोपूलकर आदी उपस्थित होते. शहरात यानंतर जर गुटखाविक्री झाली, तर पुन्हा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल माटोडे यांनी अन्न व प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांना दिला.
सहआयुक्तांना बेशरमचे रोपटे भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 23:51 IST
शहरात मोठ्या प्रमाणात गुटखाविक्री होत असल्याने संतापलेल्या युवा सेनेने शुक्रवारी एफडीएच्या कार्यालयात जाऊन सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांना बेशरमचे रोपटे भेट दिले.
सहआयुक्तांना बेशरमचे रोपटे भेट
ठळक मुद्देयुवा सेनेचे आंदोलन : गुटखाविक्री जोरात