शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

वाढत्या कोरोनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 05:01 IST

 ‘एससीडीसी’चे संचालक सुजित सिंग यांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय समितीने जिल्ह्यात आढावा बैठक घेऊन कोरोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही सूचना केल्या होत्या. यानंतर त्यांनी मुंबईला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद साधला होता. यासंदर्भात विभागीय आयुक्त पीयूश सिंह यांच्याशीही संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

ठळक मुद्देकेंद्रीय पथकांचे रिपोर्टींग, विभागीय आयुक्तांना आरोग्यमंत्र्यांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी तीन सदस्यीय केंद्रीय समितीने कोरोना संसर्गवाढीचा आढावा घेतला. पथकाने नोंदविलेल्या निरीक्षणाचे रिपोर्टींग त्यांनी ८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना केल्यानंतर  अधिक सतर्क राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना केल्याची माहिती आहे. ‘एससीडीसी’चे संचालक सुजित सिंग यांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय समितीने जिल्ह्यात आढावा बैठक घेऊन कोरोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही सूचना केल्या होत्या. यानंतर त्यांनी मुंबईला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद साधला होता. यासंदर्भात विभागीय आयुक्त पीयूश सिंह यांच्याशीही संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे १० महिन्यांच्या कालावधीत ८ फेब्रुुवारीपर्यंत २,५०,३०० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात २३,३९३ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. हा दर १२.५६ टक्के आहे. या कालावधीत हायरिस्कच्या ६७,५२९ जणांशी संपर्क आलेला आहे. हे प्रमाण १.९६ टक्के तर लो रिस्कमध्ये १,८२,७७० व्यक्तीशी संपर्क करण्यात आलेला आहे. हे प्रमाण ७.८४ टक्के आहे. मात्र  आरोग्य संचालकांनी एका कोरोनाग्रस्तामागे ३० कॉन्टक्ट ट्रेसींगचे निर्देश दिले असताना अमरावती जिल्ह्यात हे प्रमाण खूप माघारल्याने कोरोना संसर्गात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा आरोप होत आहे.आतापर्यंत २३,३९३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. यात ७८१८ पॅझिटिव्ह हे ग्रामीण भागातील आहे. यापैकी ७,३६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. महापालकिा क्षेत्रात २५५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला, तर ग्रामीण भागात १६९ व्यक्ती कोरोनाचे बळी ठरले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७००५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी ३९८ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहे. आयसीयूमध्ये ८१ रुग्ण आहेत तर २ रुग्णाला व्हेंटीलेटर लागले आहे. २८० ऑक्सिजन बेडपैकी ६२ बेडवर रुग्ण असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकाच्या अहवालात नमूद आहे. 

१०,८७४ जणांना कोरोनाची लसमंगळवारपर्यंत जिल्ह्यात १०,८७४ पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थींना कोरोनाची लस देण्यात आलेली आहे. यासाठी केंद्रही वाढविण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २१ बुथवर लसीकरणाचे सत्र सुरू आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील महसूलसह शासकीय यंत्रणांना कोरोनाची लस व काळजी घ्यायच्या टिप्स देण्यात येत आहे. 

असिम्टमॅटिक रुग्णांचा खुलेपणाने वावरकोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य संचालकांनी एका रुग्णामागे किमान ३० कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहे. जिल्ह्यात मात्र, जिल्ह्यात मात्र हे  प्रमाण १० टक्कयांवरच असल्याने असिम्टमॅटिक रुग्ण बाहेर मोकळेपणाने वावरत आहे. त्यामुळेही काही प्रमाणात संसर्ग वाढल्याची वस्तूस्थिती आहे. 

कोरोनासंदर्भातील उपाययोजनांचे पालन करण्यासोबतच ज्या भागात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत आहे, तेथे चाचण्या वाढविणे, याशिवाय रुग्णालयातील बेडची स्थिती, औषधींचा साठा पुरेसा ठेवण्याच्या सुचना आहेत.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस