शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बंद पॅसेंजर गाड्या गुरुवारपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:56 IST

भुसावळ-नागपूर मार्गावर गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेल्या १० पॅसेंजर फेऱ्या गुरुवार, १८ जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहे. खासदार नवनीत रवि राणा यांच्या सततच्या पाठपुराव्याने रेल्वे मंत्रालयाने गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देअडीच महिन्यानंतर जाग : नवनीत राणांच्या पाठपुराव्याला यश, रेल्वे बोर्डाने पत्र काढले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भुसावळ-नागपूर मार्गावर गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेल्या १० पॅसेंजर फेऱ्या गुरुवार, १८ जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहे. खासदार नवनीत रवि राणा यांच्या सततच्या पाठपुराव्याने रेल्वे मंत्रालयाने गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.नागपूर-भुसावळ मार्गाचे काम करण्याच्या नावाखाली १० फेºया पॅसेंजरच्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दैनदिन रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांनी खासदार राणा यांची भेट भेटली. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने गरीब, सामान्य प्रवाशांचे होत असलेले हाल आणि आपबीती कथन केली. त्यानुसार खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे बंद केलेल्या सर्व पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली. रेल्वे बोर्डाने मंगळवारी अधिकृत पत्र जारी करून बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. १८ जुलैपासून पुन्हा पॅसेंजर धावणार आहे. नागपूर-भुसावळ (५१२८५) ही जुलै रोजी सुरू होईल. नागपूर-वर्धा (५१२६०) ही पॅसेजर १८ जुलै रोजी धावणार आहे.तर भुसावळ - नागपूर (५१२८५) ही पॅसेंजर १९ जुलै रोजी सुटेल. भुसावळ-वर्धा (५११९७), वर्धा- भुसावळ (५११९८) ही १८ जुलै रोजी धावणार आहे. पॅसेंजर सुरू होत असल्याने सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.या पॅसेंजर सुरू होतीलनागपूर-भुसावळ (५१२८६), भुसावळ-नागपूर (५१२८५), नागपूर-वर्धा (५१२६०), वर्धा- नागपूर (५१२५९), वर्धा-अमरावती (५१२६१), अमरावती-वर्धा (५१२६२), अजनी-काजीपेठ (५७१३५), काजीपेठ-अजनी (५७१३६), भुसावळ-वर्धा (५११९७), वर्धा-भुसावळ (५११९८)प्रवासी संख्येत घट; उत्पन्न कायमअडिच महिन्यापासून पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे दरमहा १० ते १२ हजार प्रवासी घटले आहेत. मात्र, रेल्वेच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती एका वाणिज्य विभागातील अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पॅसेंजर गाड्या बंद असल्या तरी एक्स्प्रेस व अन्य रेल्वे गाड्यांनी नागरिक प्रवास करतात. यंदा जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्या १४ हजारांनी रोडावल्याचा अहवाल बडनेरा रेल्वे स्थानकाच्या वाणिज्य विभागाने वरिष्ठांकडे पाठविला होता.रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पॅसेंजर सुरू करण्याबाबत निवेदन सादर केले होते. पॅसेंजर बंद असल्यामुळे गरीब, सामान्य प्रवाशांचे होणारे हाल आणि आर्थिक नुकसानाची माहिती दिली होती. मंगळवारी रेल्वे बोर्डाने पॅसेंजर सुरू करुन गरीब प्रवाशांना न्याय दिला आहे.- नवनीत रवि राणाखासदार, अमरावती.पॅसेंजर गाड्यांमुळे लहान, मोठ्या रेल्वे स्थानकावर कमी पैशात ये-जा करणे सुकर होते. मात्र अडिच महिन्यापासून पॅसेंजर गाड्या बंद होत्या. त्या पूर्ववत झाल्याने दिलासा मिळाला.- रोशन चव्हाण, रेल्वे प्रवासी, बडनेरा.