शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

बंद : १० नगरसेवकांसह १७ अटकेत

By admin | Updated: May 15, 2016 23:56 IST

महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या समर्थनार्थ बंद पुकारणाऱ्या १० नगरसेवकांसह १७ कार्यकर्त्यांना शहर कोतवाली पोलिसांनी अटक केली.

कोतवाली पोलिसांची कारवाई : परवानगीविना आंदोलन, जामिनावर सुटकाअमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या समर्थनार्थ बंद पुकारणाऱ्या १० नगरसेवकांसह १७ कार्यकर्त्यांना शहर कोतवाली पोलिसांनी अटक केली. रविवारी दुपारी त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्यानंतर वैयक्तीक जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला. सत्तापक्षातील नगरसेवकांसह अन्य कार्यकर्त्यांना अटक केल्याने रविवारी शहरातील वातावरण ढवळून निघाले. न्यायालय परिसरात अमरावतीकरांनी तोबा गर्दी केली. बंद दरम्यान आयोजकांनी आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण न ठेवता व्यापाऱ्यांना वेठीस धरणे तसेच सावर्जनिक मालमत्तेची नासधूस केल्याचा ठपका पोलिसांकडून ठेवण्यात आला. या पार्श्वभूमीवर रविवारी उशिरा रात्री नगरसेवकांसह कार्यकर्त्यांविरुध्द शहर कोतवाली पोलिसांनी गुन्हे नोंदविले. शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बंदला पाठिंबा देणाऱ्या टिपू सुलतान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात काही ठिकाणी धुडगूस घातला. गांधी चौकातील एका हॉटेलची पूर्ववैमनस्यातून तोडफोड करण्यात आली. बंदच्या आडून जुन्या घटनेचा वचपा काढण्यात आला.रात्रीपासूनच अटकसत्र सुरूअमरावती : बंद पुकारणाऱ्या बहुतेक नगरसेवकांचा या तोडफोडीशी संबंध नव्हता. मात्र, धुडगूस घालणाऱ्यांसह त्यांचे नेते बंदच्या व्यासपीठावर असल्याने पोलिसांनी नगरेसवकांना त्यासाठी दोषी धरले व अटकसत्र राबविले. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी ३२ कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविच्या कलम १४७, १४८, १४९, ५०६, ४२९, १०९ अन्वये गुन्हा नोंदविला. शनिवारी उशिरा रात्री शहर कोतवाली पोलिसांनी आसिफ हुसेन, अब्दुल रफिक आणि अरुण जयस्वाल या तीन नगरसेवकांना अटक केली. रविवारी सकाळी पुन्हा अटकसत्र राबविण्यात आले. त्यामध्ये स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, काँग्रेसचे पक्षनेता बबलू शेखावत, दिनेश बूब, धीरज हिवसे, प्रदीप बाजड, इमरान अशरफी, हमीद शद्दा या नगरसेवकांसह युवासेनेचे राहुल माटोडे, अब्दुल नदिम, शाकाल तिवारी, विक्की चवरे, योगेश चवरे, विनय सिरसिया, विक्की घारू, आरिफ हुसैन यांना अटक करण्यात आली. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या अटक सत्रामुळे शहरात खळबळ उडाली. शहर कोतवाली ठाण्याच्या परिसरात राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती. अटक केलेल्यांना रविवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)यांना मिळाला जामीनअविनाश मार्डीकर, दिनेश बुब, प्रदीप बाजड, धीरज हिवसे, बबलू शेखावत, राहुल माटोडे, शारदाप्रसाद तिवारी, विक्की चावरे, योगेश चावरे, विनय सिरसिया आणि विक्की घारू यांची बाजू प्रशांत देशपांडे, मोहित जैन, गणेश गंधे या वकिलत्रयीने मांडली तर नगरसेवक इम्रान अशरफी, हमीद शद्दा, आरिफ हुसैन आणि नदिम यांची बाजू शोएब खान यांनी मांडली. तसेच अनंत विघे व राजेश शर्मा या वकिलद्वयीने अनुुक्रमे अरुण जयस्वाल आणि अब्दुल रफीक यांच्यासाठी युक्तिवाद केला. १७ आरोपींचे कृत्य समाजविघातक नव्हते. जनतेचा आवाज शासनाकडे पोहोचविण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता, असा युक्तिवाद विधितज्ज्ञांकडून करण्यात आला. यांना बनविले आरोपी शहर कोतवाली पोलिसांनी अविनाश मार्डीकर, बबलू शेखावत, प्रदीप बाजड, हमीद शद्दा, आसिफ हुसेन, आरिफ हुसेन, इमरान अशरफी, अब्दुल रफिक ऊर्फ रफ्फू पत्रकार, धीरज हिवसे, अरुण जयस्वाल या नगरसेवकासह युवा स्वाभिमान संघटनेचे शहराध्यक्ष संजय हिंगासपुरे, हरिदास शिरसाट, विक्की घारू, सुनील भडके, विशाल वानखडे, पराग देशमुख, गणेश निंदाने, राज सारवान, विक्की चावरे, गुरु डेंडवाल, विजय सिरसिया, रोहण सिरसिया, अमित सिरसिया, अवी डेंडवाल, योगेश चावरे, राहुल सिरसिया, राहुल माटोडे, शेख नदिम शेख रफिक, गोलू साखा, मुन्ना तिवारी, श्याम पिंगळे यांच्यासह ३२ कार्यकर्त्यांना आरोपी बनविले आहे. समाजहितार्थ आंदोलन, जामिनावर मुक्ततामहापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करण्यासाठी लोकचळवळ उभारली गेली. जनतेचा तो आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या अशिलांनी बंद पुकारला. त्यात कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नव्हता, असा वास्तवदर्शी युक्तिवाद बचावपक्षाकडून करण्यात आला. तो ग्राह्य धरून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (६) वाय.डी. कोईनकर यांच्या न्यायालयाने १७ आरोपींना साडेसात हजाराच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. व्यापारी प्रतिष्ठाने जबरीने बंद करण्यात आली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. या अनुषंगाने आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाच नगरसेवकांसह १८ जणांना अटक करून त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. -ज्ञानेश्वर कडू, पोलीस निरीक्षक, कोतवाली पोलीस ठाणे.