शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

अमरावती ; येथील जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी ४९ कोटी ८३ लाख रुपये निधीला ग्रामविकास विभागाने मान्यता दिली असून, ...

अमरावती ; येथील जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी ४९ कोटी ८३ लाख रुपये निधीला ग्रामविकास विभागाने मान्यता दिली असून, जिल्हा परिषदेसाठी एक अद्ययावत इमारत साकारली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

जिल्ह्यात दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनेक प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात आली आहे. त्यासाठी शासनाकडून निधी मिळण्यासाठी पालकमंत्र्याकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी निधी मंजूर झाला असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

बॉक्स

आधीची इमारत ब्रिटिशकालीन

जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत ब्रिटिशकालीन आहे. या इमारतीचे बांधकाम १८८९ मध्ये झाले आहे. इमारत काहीशी जीर्ण व शिकस्त झाल्याने इमारतीचे नूतनीकरण करणे शक्य नाही. जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम प्लॉट क्रमांक ३१/४ च्या क्षेत्रावर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून २९ हजार ५०० चौरस मीटर जागा जिल्हा परिषदेकडे देण्यास मान्यता दिली आहे.

बॉक़्स

‘जी प्लस फोर’ बिल्डिंग

जिल्हा परिषदेचे पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालये आदींसाठी सद्यस्थितीतील जागा अपुरी पडत असल्यामुळे नवीन प्रशासकीय इमारत तळमजला अधिक चार मजल्यांची बांधण्याचा निर्णय झाला आहे. या इमारतीचे बांधकाम १२ हजार १९१ चौरस मीटर असेल. इमारतीच्या आराखड्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वास्तुशास्त्रज्ञ यांनी मान्यता दिली असून लेआऊट प्लॅन, स्थळदर्शक नकाशा आदी कागदपत्रेही सादर करण्यात आली आहेत. इमारतीसाठी नगर रचना प्राधिकरण व अग्निशमन यंत्रणेची मंजुरी आदी प्रक्रिया वेळेत पार पाडावी. महिला पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र आवश्यक व्यवस्था असावी, असे आदेश आहेत.

बॉक्स

'ग्रीन बिल्डिंग' संकल्पनेचा समावेश

संकल्पना अमलात आणून नैसर्गिक प्रकाश योजना व वायुविजन, पाण्याच्या व ऊर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुनर्भरण व जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधनसामग्रीचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.