लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : दप्तरदिरंगाई आणि लोकप्रतिनिधींच्या फुक्या आश्वासनात अडकलेल्या स्थानिक स्मशानभूमीची गुरुवारी धूळवडीच्या दिवशी संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. या स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गतवर्षी एका मृतदेहावर बसस्थानकानजीक उघड्यावर अंत्यसंस्कार करावा लागला होता. यानंतर आश्वासने दिली गेली. तथापि, स्मशानात जाण्यासाठी रस्ता बनलेला नाही. त्याचा प्रतीकात्मक निषेध म्हणून बालगोपालांनी हा संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ केला.स्थानिक मातोश्री विमलाबाई वाडेकर बालगृहाच्या विद्यार्थ्यांनी धूळवडीला कचरा संघटित करून होळी साजरी केली. संस्थेचे सचिव डॉ. रघुनाथ वाडेकर, शिक्षक नितीन ठवकर यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी स्मशानभूमी ओटा झाडून पाण्याने धुवून काढली. तेथून निघालेल्या काडी कचऱ्याची होळी केली. तेथील झाडांना पाणी दिले.
धूळवडीला स्मशानभूमीची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:39 IST
दप्तरदिरंगाई आणि लोकप्रतिनिधींच्या फुक्या आश्वासनात अडकलेल्या स्थानिक स्मशानभूमीची गुरुवारी धूळवडीच्या दिवशी संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. या स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गतवर्षी एका मृतदेहावर बसस्थानकानजीक उघड्यावर अंत्यसंस्कार करावा लागला होता.
धूळवडीला स्मशानभूमीची स्वच्छता
ठळक मुद्देकचऱ्याची होळी : बालगोपालांचा पुढाकार