शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शहर कडकडीत, ग्रामीण संमिश्र

By admin | Updated: July 23, 2016 00:42 IST

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाने बुधवारी चांदूरबाजार येथे तीन निष्पापांचा घेतलेला बळी, गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी व्हावी,...

अवैध गोवंश वाहतूक : अचलपूर, परतवाडा, तिवसा, चांदूरबाजार, भातकुली, वरुड, मोर्शीत उत्स्फूर्त बंद लोकमत चमू  अमरावती गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाने बुधवारी चांदूरबाजार येथे तीन निष्पापांचा घेतलेला बळी, गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी व्हावी, गोवंश प्राण्यांच्या कत्तली आणि वाहतुकीवर कायम प्रतिबंध लावण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी पुकारलेल्या बंदला शहरात कडकडीत तर ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी ७५ कार्यकर्त्यांना अटक व सुटका केली. गोरक्षा समितीसह हिंदूत्ववादी संघटना, भाजप, शिवसेना आदींनी बंदची हाक दिली होती. अमरावती व बडनेरा शहरातील मुख्य बाजारपेठ स्वयंस्फुर्तीने बंद ठेवली होती. दुपारनंतर बाजारपेठेत सुरु झाली. शुक्रवारी सकाळपासून शहरातील मुख्य बाजारपेठ बंद असले तरी काही भागात सुरु असलेली दुकाने बंद करण्यासाठी शिवसेनेला रस्त्यावर उतरुन ते बंद करावे लागले. बडनेऱ्यातील नवीवस्ती व जुनीवस्ती येथील मुख्य बाजारपेठ बंद ठेवून व्यावसायीकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस कंमाडो, दंगा नियंत्रक पथक, १० पोलीस निरिक्षक, १२०० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक हे शुक्रवारी १२.३० वाजताच्या सुमारास राजकमल चौकात उपस्थित होते. भाजपचे शहराध्यक्ष जयंत डेहनकर यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. यावेळी अनिल आसलकर, विवेक कलोती, ललीत समदूरकर, बादल कुळकर्णी, सुरेखा लुंगारे, संध्या टिकले, राजू कुरील, राजेश अनासाने, लता देशमुख, रिता मोकलकर, निलेश शिरभाते आदी उपस्थित होते. निषेध सभेपूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी करुन राजकमल चौक दणाणून सोडला. चपराशीपुरा येथे दगडफेक झाल्याची चर्चा आहे. तिसऱ्या दिवशीही चांदूरबाजार बंद हिंदूत्ववादी संघटनांच्या बंदच्या आवाहनाला शहरातील नागरिकांनी व व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. व मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी आनंद अहीर, किशोर मेटे, सागर भोंगडे, अजय श्रृंगारे, ललित पवार, सोनू हेमनानी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तिवस्यात उत्स्फूर्त प्रतिसाद शहरात बजरंग दल, भाजपा कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून बंदचे आवाहन केले. शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले. गोवंशाची अवैध वाहतूक बंद करण्यात यावी, त्याकरिता तहसीलदार राम लंके यांना निवेदन सादर करुन दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी बजरंग दलचे हर्षद बऱ्हाणपुरे, अंकीत चौबे, योगेश मोरेघडे, प्रवीण ढोबाळे, शंकर पाटील, राहूल रार्घोते, योगेश निपाले, रितेश भोंबे, मंगेश इजापुरे, राहुल मारबदे आदी कार्यकर्ते रस्त्यावर आले होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता. भातकुलीमध्ये स्वयंस्फूर्त बंद शहरात शुक्रवारी व्यावसायिकांनी उत्स्फूर्त बंद पाळला. बंद दरम्यान एसटी सुद्धा रोखण्यात आली. यावेळी बंडुभाऊ वानखडे, संतोश शिंदे, किशोर लेंडे, गजानन चुनकीकर, विनोद अंबर्ले, संदीप कळमखेडे, पांडुरंग बगाडे, सुरेश बावने, प्रदीप देशमुख, प्रकाश राऊत आदींचा बंदमध्ये सहभाग होता. अचलपूर- परतवाडा कडकडीत बंद परतवाडा आणि अचलपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. अपघातातील मृतांना श्रद्धाजंली अर्पीत करण्यात आली. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांना बजरंग दल, भाजपा आणि युवा मोर्चाच्यावतीने देण्यात आले. यावेळी पवन जडिये, गजानन कोल्हे, रुपेश ढेपे, बंडू घोम, मनोहर गिडवाणी, आशिष सहारे, निलेश सातपुते, कौस्तुभ मुंडे, प्रवीण तोंडगावकर, किशोर कासार, विनय चतुर, आकाश श्रीवास्तव, अक्षय पाठक, अनिल तायडे, विलास डोंगरे, राजा पिंजरकर, सुमित चांगल, ओमप्रकाश दीक्षित, वीरेंद्र उदापुरकरसह उपस्थित होते. बडनेऱ्यात कडकडीत बंद शहरात बंद कडकडीत पाळण्यात आला. बहुतांश राजकीय पक्ष, हिंदू संघटनांचा सहभाग होता. व्यावसायीकांना स्वंयस्फूर्त बंद पाळला. बंदमध्ये किशोर जाधव, नगरसेवक चंदूमल, बिल्दानी, महेश भिंडा, विश्वजीत डुमरे, मंगेश गाले, किशोर गणवानी, गजेंद्र भैसे, अन्नू शर्मा, किशोर पवार, गौरव बांते, जयंता भगत, विक्रम लाड, संजय कटारिया, विनोद सत्रावळे, श्रीरंग बडनेरकर, निलेश सावळे, किरण अंबडकार, गजानन परकाले, उमेश निलगीरे, सुखलाल कैथवास, मिथून सोळंके, बंडू धामणे, महावीर देवडा, बाबू कोमरे, बंडु सरोदे, किरण पवार, बाळू शिंदे, आनंद जोशी आदी सहभागी झाले होते. वरुडात उत्स्फूर्त बंद शहरात बजरंग दल, विश्वहिंदू परिषद, भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच युवा व्यापारी संघ, यंग मुस्लीम मल्टीपरपज सोसायटी आदींनी बंदची हाक दिली होती. बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद होते. आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार आशिष बिजवल यांना निवेदन सादर केले. यावेळी विक्की ठाकूर, नरेश घोडसाडे, विजय श्रीराव, मोरश्वर वानखडे, नरेंद्र फसाटे, विनोद डाहाके, सचिन आंजिकर, प्रमोद टाकरखेडे, हरिष वरखेडकर, बंटी काझी, राहूल चौधरी, जितेन शहा, विक्की इंगळे आदी उपस्थित होते. मोर्शीत बाजारपेठ बंद बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय पूर्णत: