शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

शहरात गावठी, अवैध दारूचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:01 IST

शहरात गावठी दारूसह अवैध देशी दारूचा महापूरच असल्याचे पोलिसांनी दोन दिवसांत केलेल्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांत अवैध देशी दारूच्या २६, तर गावठी दारूसंबंधी पाच कारवाया करून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदोन दिवसांत ३१ कारवाया : पोलिसांचे दुर्लक्ष कारणीभूत?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात गावठी दारूसह अवैध देशी दारूचा महापूरच असल्याचे पोलिसांनी दोन दिवसांत केलेल्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांत अवैध देशी दारूच्या २६, तर गावठी दारूसंबंधी पाच कारवाया करून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावरूनच आजपर्यंत शहरात अवैध दारूची विक्री सुरू असल्याचे दिसून येत असून, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केले, हा संशोधनाचा विषय आहे.गेल्या वर्षात मुंबईत अवैध दारूविक्रेत्याकडील विषाक्त दारू प्यायल्याने तब्बल शंभर जण दगावले होते. त्यावेळी राज्यभरातील गावठी दारूविक्री अड्ड्यांवर धाडसत्र राबवून शेकडोंना ताब्यात घेऊन त्याच्यांकडील हजारो लिटरची दारू नष्ट करण्यात आली होती. अमरावती पोलिसांनीही मोहीम राबवून अनेक कारवायांची नोंद केली होती.नवे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या कार्यकाळात पुन्हा अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईचा सपाटा पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, नव्या पोलीस आयुक्तांना दाखविण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पुन्हा या कारवाया सुरू केल्या असाव्यात, अशी शंका उपस्थित होत आहे.दरम्यानच्या काळ्यात अवैध दारूविक्रेत्यांना सुट मिळाल्याने त्यांचे धंदे चांगलेच फोफावले होते. याचा अंदाज सद्यस्थितीत सुरू असलेल्या कारवायांवरूनच सहज लक्षात येऊ शकते.देशी दारूच्या अवैध व्यवसायाला उधाणदोन दिवसांत दहाही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध देशी दारूच्या विक्रीला उधाण आले होते.पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी टाकून अवैध देशी दारूविक्रेत्यांकडून २४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रुक्साना युसूफ गोचेवाले (रा. कुंभारवाडा), दिनेश भीमराव बगेल (३२, रा. हातुर्णा), अतिश कल्याण जवंजाळ (२४, रा. वलगाव), बय्यो छोटू चौधरी (रा. कुंभारवाडा), चंदू डोमाजी गजभिये (४०, रा. कवठा बहाळे), राजहंस बापूराव गोंडाणे (६०, रा. संजय गांधीनगर), पंकज सूरज तायडे (रा. रमाबाई आंबेडकरनगर), सुरेश दादू निखरे (रा. मांडवा झोपडपट्टी), इक्बाल सुभाष चौधरी (३०), विजय महादेव कदम (३२, रा. बडनेरा), मो. मुशर्र्रफ मो. अशरफ (रा. हबीबनगर), धोंडू दत्तजी गाडे (६०, रा. खारतळेगाव), नरेश गणेश हरदो (४९, रा. बाजारपुरा), महबूब शाह सब्जू शाह (५५, रा. वलगाव), सूरज धनराज ढोके (रा. रहाटगाव), गुड्डू बाबूलाल कुरवाने (रा. चिचफैल), अजय पांडुरंग माहुलकर (रा. बेलपुरा), राहुल गणेश प्रधाने (रा. महाजनपुरा), रघुनाथ नामदेव रंधवे (रा. खरकाडीपुरा), सुभाष हरिभाऊ राणे (रा. गणोरी), संतोष वासुदेव कनोजे (रा. कुंभारवाडा), जगदीश माणीक सयाम (रा. चिचफैल), प्रमोद नत्थूआपा चिकाटे (४०, रा. मायानगर) व काही महिलांचाही आरोपींमध्ये सहभाग आहे. पोलिसांच्या कारवायांमध्ये सातत्य राहील काय, याचीदेखील चर्चा झडत आहे.१७ हजार ६०० रुपयांची गावठी दारू जप्तफे्रजरपुरा हद्दीत सर्वाधिक गावठी दारूची विक्री होत असल्याचे यापूर्वीही निदर्शनास आले आहे. सोमवारी फे्रजरपुरा पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वडाळी स्थित परिहारपुरा येथे धाडसत्र राबवून तब्बल १७ हजार ६०० रुपयांची गावठी दारू, मोहाचा सडवा जप्त केला आहे. बाली भीमराव बेनीवाले व चार महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे.