स्मार्ट सिटीसाठी ५० कोटींची मागणी : जीएसटी अनुदानावरही चर्चालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराचा विकास आणि निधीच्या मुद्यावर बुधवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या मुख्य उपस्थितीत खल होणार आहे. याबैठकीला मनपा आयुक्त पवार यांच्यासह स्थायी समिती सभापती तुषार भारतीय उपस्थित राहतील. शहरातील अनेक विकासकामे निधी आणि राजकारणात अडकली आहेत. मंत्रालयस्तरावर त्यावर तोडगा काढण्यासाठी तसेच शहराच्या समस्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या समक्ष ठेवण्यासाठी मुंबई मंत्रालयात बुधवारी ही बैठक होईल. छत्रीतलावाच्या सौंदर्यीकरणासाठी आ.राणा आग्रही असताना स्थायी समितीने पीएमसीसाठी नव्याने निविदा मागविण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. यामुद्यावरही बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. याशिवाय दैनंदिन स्वच्छतेच्या कंत्राटासाठी योजिलेल्या प्रक्रियेवर चर्चा होईल. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतही अमरावतीचा समावेश होऊ शकला नाही. यापार्श्वभूमिवर राज्य सरकारने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एसपीव्ही गठित केल्यानंतर ५० कोटींचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो निधी मनपाला त्वरित देण्यात यावा, ही मागणी रेटली जाईल. याशिवाय अकोली वळण रस्ता,माध्यमिक शिक्षकांचे प्रलंबित अनुदानाची मागणे केली जाणार आहे.जीएसटीच्या अनुदानाची भक्कम मागणी महापालिकेची गंभीर आर्थिक परिस्थिती पाहता जीएसटीचे सहायक अनुदान त्वरित मिळावे, अशी मागणी प्रशासनाच्यावतीने केली जाणार आहे. एलबीटी तूट आणि एलबीटीच्या तुलनेत जीएसटीचे अनुदान देताना वाढ करण्यात यावी, अशी अपेक्षाही प्रशासनाच्यावतीने व्यक्त केली जाणार आहे.
शहर विकासावर आज मुंबईत खल
By admin | Updated: July 5, 2017 00:47 IST