मोर्शी : कोरोनाची महाभयंकर परिस्थिती असताना संपूर्ण शासकीय कामे पूर्णतः बंद झाले होते. त्यामुळे नागरिकांना श्रावणबाळ व संजय गांधी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनात मोर्शी तालुक्यात धानोरा येथे आमदार आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून श्रावणबाळ व संजय गांधी योजनांचा नागरिकांना लाभ मिळण्याकरिता प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने राजकारण न करता शंभर टक्के समाजकारण करण्याच्या हेतूने अपंग बांधव, विधवा भगिनींना तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्काचा लाभ प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून धानोरा येथील शेकडो नागरिकांनी या योजनेचा लाभ प्राप्त करण्याकरिता अर्ज केलेले आहे. या उपक्रमाबद्दल मोर्शी तालुक्यातील नागरिकांनी आ. देवेंद्र भुयार यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी धानोरा येथील सरपंच दिनेश जवंजाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार, उपाध्यक्ष रुपेश वाळके, उपसरपंच आनंद धुर्वे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर धुर्वे, विजय सिरसाम, आनंद पनडे, प्रदीप आहाके, स्वप्नील पाटणकर, नीलेश उईके, मन्सू उईके, ग्रामसेवक गोरले, तलाठी उके, रोशन राऊत, गोकुल आहाके, हरिभाऊ आहाके, महेंद्र थिगळे, उमेश उईके आदी मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.
धानोरा येथे श्रावणबाळ व संजय गांधी योजना आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST