शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

नागरिकांनो सावधान! झटपट लोन ॲप, फसवणुकीचा ‘ट्रॅप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2022 00:05 IST

पैशाची गरज असते तेव्हा आधी फक्त बँक आणि ओळखीच्या व्यक्तींकडूनच कर्ज मिळत असे; पण सध्या मोबाइलच्या माध्यमातून एका क्लिकवर झटपट कर्ज मिळत आहे. तत्काळ कर्ज मिळत असल्याने कर्ज घेणारे त्या ॲपची फारशी माहितीही घेत नाहीत. आधार कार्डवर कर्ज मिळत असल्याने या माहितीचा गैरवापर करून आर्थिकदृष्ट्या फसवले जात आहे. मोबाइल ॲपच्या सर्व नोटिफिकेशनला परवानगी दिली जात असल्याने मोबाइलमधील सर्व डेटा आपोआप कॉपी केला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तुम्ही मोबाइल ॲपच्या मदतीने ऑनलाइन कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आताच सावध व्हा. कारण, कर्ज घेतल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी नाहक त्रास देऊन धमक्या देण्याचे तसेच बदनामी करण्याचे प्रकार सुरू केले आहेत. याबाबतच्या तक्रारीदेखील सायबर सेलकडे प्राप्त होऊ लागल्या आहेत. यात प्रामुख्याने चायनीज ॲप डाऊनलोड करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. पैशाची गरज असते तेव्हा आधी फक्त बँक आणि ओळखीच्या व्यक्तींकडूनच कर्ज मिळत असे; पण सध्या मोबाइलच्या माध्यमातून एका क्लिकवर झटपट कर्ज मिळत आहे. तत्काळ कर्ज मिळत असल्याने कर्ज घेणारे त्या ॲपची फारशी माहितीही घेत नाहीत. आधार कार्डवर कर्ज मिळत असल्याने या माहितीचा गैरवापर करून आर्थिकदृष्ट्या फसवले जात आहे. मोबाइल ॲपच्या सर्व नोटिफिकेशनला परवानगी दिली जात असल्याने मोबाइलमधील सर्व डेटा आपोआप कॉपी केला जातो.

लोन ॲपवरून फसवणूक झाली तर... लोन ॲपवरून फसवणूक झाली तर तत्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवावी. सायबर भामटे विविध सीमवरून कॉल करीत असतात. अशा कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. असे केल्यास फसवणूक होण्यापासून टाळता येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केले आहे.

केवळ पाच गुन्हे दाखल

- अमरावती ग्रामीणमधील सायबर पोलीस ठाण्याने आठ महिन्यात सायबर फ्रॉड व विनयभंगाबाबत एकूण ५४ गुन्हे नोंदविले. - त्यात लोन फ्रॉडशी संबंधित पाच गुन्हे आहेत. 

फसवणूक टाळण्यासाठी काय कराल ?

कुठल्याही झटपट लोनच्या आलेल्या लिंकला डाऊनलोड करू नका. सायबर भामट्यांच्या आमिषाला बळी पडू नका. कर्ज फेडल्यानंतरही जादाची रक्कम कुणी मागत असल्यास त्याला प्रतिसाद देऊ नका.

एका आरोपीला अटक 

आठ महिन्यांत झटपट लोनच्या नावाखाली फसवणूकप्रकरणी पाच गुन्हे नोंदविले गेले. त्यात एका आरोपीला अटक करण्यात आली. सायबर भामटे हे दिल्ली, बिहार, झारखंड, पश्चिम  बंगाल येथील असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे अटकेला मर्यादा आल्या आहेत.

क्विक लोनच्या मोहात अडकू नका

सोशल मीडियावर झटपट लोनबाबत लिंक पाठविली जाते. २० ते  ५० हजारांपर्यंतचे लोन दिले जाते. मात्र, त्यानंतर ३५ टक्के व्याज लावून पैसे उकळले जातात. कर्ज न फेडल्यास वेगवेगळ्या पद्धतीने धमक्याही दिल्या जातात. मोहाला बळी पडू नका. - बी. डी. पावरा, पोलीस निरीक्षक, सायबर 

 

टॅग्स :fraudधोकेबाजी