शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सहकाऱ्याच्या गोळीबारात कारंजातील सीआयएसएफ जवानाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 22:32 IST

काश्मिरातील उधमपूर कॅम्पमधील घटना

कारंजा: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएफ) जवानाने केलेल्या गोळीबारात दोघा जवानांचा मृत्यू झाला. त्यात वाशिम जिल्ह्यातील कारंजा गवळीपुरा येथील रहिवासी तस्लीम सलीम मुन्नीवाले या जवानाचा समावेश आहे. दरम्यान, गोळीबार करणाºया जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती गंभीर आहे. ही घटना १४ जानेवारी रोजी दुपारी काश्मिरातील उधमपूर सीआयएफच्या जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर सुई या गावात घडली.

सीआयएफ दलाच्या उधमपूर जिल्ह्यातील सुई या गावामध्ये युनिट क्रमांक २५१ कार्यरत असलेल्या संजय ठाकरे नावाच्या जवानाने मंगळवार १४ जानेवारी रोजी दुपारी त्याच्या सहकारी जवानांवर गोळ्या झाडल्या. त्यात संजय ठाकरे याच्यासह कारंजा येथील रहिवासी कॉन्स्टेबल तस्लिम सलीम मुन्नीवाले तसेच सहकारी कॉन्स्टेबल बी. एन.मूर्ती  हे दोघे जखमी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बी. एन. मूर्ती आणि तस्लीम मुन्नीवाले यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले, तर संजय ठाकरे याची प्रकृतीही चिंताजनक आहे.

दरम्यान, संजय ठाकरे हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती आहे. तस्लिम सलीम मुन्नीवाले (३४) हा जवान मुंबई तारापूर सीआईएसएफ मुख्यालयात कार्यरत होता; मात्र तात्पुरते स्वरूपात बंदोबस्ताकरिता जम्मू-काश्मीर येथे त्यांच्या युनिटला पाठविण्यात आले होते. तस्लिम हा कारंजा येथील किसनलाल नथमल गोयनका महाविद्यालयाचा माजी विद्याथी आहे. तो सन-२००८ मध्ये सीआयएसएफमध्ये दाखल झाला होता.माझा भाऊ तस्लीम मुन्नीवालेची काश्मिरमधील उधमपूर जिल्ह्याच्या कॅम्पमध्ये तात्पुरत्या स्वरुपात बंदोबस्तासाठी नियुक्ती झाली होती. सहकारी जवानाने गोळ्या घालून त्याची हत्या केल्याची माहिती सीआयएसएफच्या कॅम्पमधून सांयकाळच्या सुमारास मिळाली.-हनीफ मुन्नीवाले

टॅग्स :AmravatiअमरावतीDeathमृत्यू