शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळ पोलीस ठाण्याला गावकऱ्यांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:58 IST

नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेले राजेंद्र निमकर यांच्या मृत्यूनंतर वनविभाग व पोलीस प्रशासनाने सुरक्षिततेबाबत कोणतीही दखल न घेतल्याने रविवारी परिसरातील संतप्त शेतकरी व मजुरांनी मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याला घेराव घातला.

ठळक मुद्देनरभक्षी वाघाला जेरबंद करण्याची मागणी : पिंजºयाला उशीर झाल्याचा रोष

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेले राजेंद्र निमकर यांच्या मृत्यूनंतर वनविभाग व पोलीस प्रशासनाने सुरक्षिततेबाबत कोणतीही दखल न घेतल्याने रविवारी परिसरातील संतप्त शेतकरी व मजुरांनी मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याला घेराव घातला.मंगरूळ दस्तगीर येथील शेतकरी राजेंद्र निमकर हे चारा आणण्यासाठी शेतात गेले असता, वाघाने शुक्रवारी त्यांना ठार केले. तद्नंतर वनविभागाने बंदूकधारी वनकर्मचाऱ्यांना तैनात केले. वनविभागाने शनिवारी एक म्हैस वाघाचे अस्तित्व जाणून घेण्याकरिता बांधून ठेवली होती. या वाघाने मध्यरात्री त्या म्हशीची शिकार केली. वाघाचे अस्तित्व सिद्ध होऊनही त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने कोणतीच उपाययोजना न केल्याने व अद्यापही हा वाघ परिसरातच असल्याने शेतात काम करण्यासाठी जाण्यास कुणाचीही हिंमत होत नाही. सध्या शेतमाल गोळा करण्याचा हंगाम सुरू असला तरी वाघाच्या दहशतीमुळे शेतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. त्यामुळे ४०० ते ५०० शेतकरी व शेतमजुरांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंगटे यांनी घटनास्थळी दाखल होऊन शांततेचे आवाहन केले. वनविभागाच्या वरिष्ठांच्या निर्देशानंतर वनविभागाच्या पथकाने आलेला पिंजरा घटनास्थळावर रवाना केला.