अमरावती
केंद्र
उडाण
पुलाच्या निविदा प्रक्रिया राबविल्या गेल्या. मात्र ३३ टक्के जास्त दराने निविदा उघडल्याने १२ कोटी रुपये रक्कमेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले. या पुलाच्या निर्मितीसाठी लागणारा निधीकरिता मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली जाईल, असे सर्व सम्मतिने ठरविण्यात आले. १00 कोटी रुपये नाले संरक्षणाचा प्रस्ताव पाठविला जाईल. (प्रतिनिधी) आणि राज्य शासनाच्या सहकार्याने साकारल्या जाणार्या राजापेठ उड्डाणपूल निर्मितीचा प्रश्न त्वरेने सुटावा, यासाठी खा.अडसुळ यांच्या सुचनेनुसार ही मंथन बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त अरूण डोंगरे, पक्षनेता बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता प्रशांत वानखडे, स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, गटनेता अविनाश मार्डीकर, प्रकाश बनसोड, संजय अग्रवाल, दिंगबर डहाके, तुषार भारतीय, प्रवीण हरमकर, कुसूम साहु, पंजाबराव तायवाडे, सुनील राऊत, डॉ. राजेंद्र तायडे, हमीद शद्दा आदी उपस्थित होते. दरम्यान आयुक्त डोंगरे यांनी अडसुळ यांचा शाल-श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी राजापेठ उडाण पुल निर्मिती संदर्भात येत असलेल्या अडचणी आयुक्त डोंगरे यांनी विषद केल्या. : येथील बहुप्रतिक्षित राजापेठ रेल्वे उड्डाणपूल निर्मितीचे भिजत घोंगडे कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिकेत मंथन बैठक घेण्यात आली. यावेळी नवनियुक्त खा. आनंदराव अडसूळ यांचा प्रशासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला.