लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या चुडामणी नदीच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणाकरीता २५ ते ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष स्वाती आंडे यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.‘चुडामणीचा श्वास कोंडला’ या वृत्तातून ‘लोकमत’ने या नदीची दुरवस्था लोकदरबारात मांडली होती. त्याची दखल घेत नदीच्या सौंदर्यीकरणासाठी व संपुर्ण स्वच्छतेसाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याच्या त्या म्हणाल्या. नगरपालिका हद्दीतील सांडपाण्याकरीता दोन्ही बाजूने नाल्या बांधून ते सर्व सांडपाणी शहराच्या शेवटी डवरगांव रस्त्याजवळ नेण्यात येईल, तेथे शुध्दीकरण प्रकल्प तयार करुन शुध्द झालेले पाणी पून्हा नदी सोडल्या जाईल. त्यासाठी १० कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तो अंदाजे २५ ते ३० कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाला मान्यतेसाठी पाठविला जाईल. नदीकाठावर हरितपट्टा विकासाच्या निविदा काढण्यात आल्या. त्या कामाला सुरूवात होणार असल्याचे त्या म्हणाल्या. नदीची दुर्दशा आणि घाणीचे साम्राज्य वाढल्याने स्थानिक जायन्टस गृप, युवा व्यापारी संघासह अन्य सेवाभावी संस्थानी पुढाकार घेवून लोकसहभाग आणि श्रमदानातून चुडामणीची स्वच्छता तसेच खोलीकरण अभियान राबविले होते. मात्र त्यानंतर पुन्हा या नदीची गटारगंगा झाली. चुडामणी ही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे . ती जतन करणे सामुहिक जबाबदारी आहे. जन आरोग्याच्या दृष्टिने नदीची स्वच्छता महत्वाची असून नगरपालिकेने पुढाकार घ्यावा, लोकसहभाग घेवून नदी स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे आहे, असे मत महिला विकास मंचच्या सचिव जया नेरकर यांनी व्यक्त केले. लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून चुडामणीची स्वच्छता करण्यात आली होती. मात्र पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. नगरपालिकेने नदी स्वच्छता अभियान राबविल्यास शहराच्या सांैदर्यात भर पडून वरूड शहर स्वच्छ आणि सुंदर होईल, अशी प्रतिक्रिया कॉग्रेसचे नगरसेवक धनंजय बोकडे यांनी दिली. यासोबतच कोणताही कचरा मी नदीपात्रात टाकणार नाही, कुणाला टाकू देणार नाही, कचरा टाकताना दिसल्यास त्याला मज्जाव करेल, अशी भूमिका वरूडकरांनी घेतल्यास नदी स्वच्छ राहू शकते, अशी सांघिक प्रतिक्रिया उमटली.
चुडामणी नदी सौंदर्यीकरण ३० कोटींचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST
‘चुडामणीचा श्वास कोंडला’ या वृत्तातून ‘लोकमत’ने या नदीची दुरवस्था लोकदरबारात मांडली होती. त्याची दखल घेत नदीच्या सौंदर्यीकरणासाठी व संपुर्ण स्वच्छतेसाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याच्या त्या म्हणाल्या. नगरपालिका हद्दीतील सांडपाण्याकरीता दोन्ही बाजूने नाल्या बांधून ते सर्व सांडपाणी शहराच्या शेवटी डवरगांव रस्त्याजवळ नेण्यात येईल, तेथे शुध्दीकरण प्रकल्प तयार करुन शुध्द झालेले पाणी पून्हा नदी सोडल्या जाईल.
चुडामणी नदी सौंदर्यीकरण ३० कोटींचा प्रस्ताव
ठळक मुद्देनगराध्यक्ष सकारात्मक : हरित क्षेत्र विकासाच्या निविदा मार्गी