आॅनलाईन लोकमतअमरावती : चितळ शहरात शिरल्याच्या प्रकाराने नागरिकांचे शुक्रवारी मनोरंजन झाले. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात वनविभागाच्या रेस्क्यू पथकाची चांगलीच दमछाक झाली. तासभराच्या प्रयत्नानंतर यामध्ये यश मिळाले. दुपारनंतर अंबादेवी, पन्नालाल बगीचा, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व औरंगपुरा भागात चितळ व वनकर्मचाºयांची लपाछपी सुरू होती.अन्न-पाण्याच्या शोधात चितळ लोणटेक परिसरातून शहरात शिरले. श्वान मागे लागल्यामुळे चितळाने आगेकूच केली. अंबा नाल्यातून ते पन्नालाल बगीचात शिरले. दरम्यान, श्वानाने चितळाचा माग सुरू ठेवला. चितळ शहरात शिरल्याच्या उत्सुकतेने नागरिकांची बघ्यांची गर्दी केली. याबाबत विहिंपचे विशाल कुळकर्णी यांनी वनविभागाला माहिती दिली. काही वेळातच रेस्क्यू पथकाचे अमोल गावनेर, सतीष इंगळे, वीरेंद्र उज्जैनकर, फिरोज खान, मनोज ठाकूर, चंद्रकात मानकर, अभि व्यवहारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यू पथकाचे अमोल गावनेर व विशाल कुळकर्णी यांनी चितळाला पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र, चितळ सात ते आठ फुटापर्यंत उडी घेत या परिसरातून त्या परीसरात जात असल्यामुळे वनकर्मचाºयांची चांगलीच तारांबळ उडाली. ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या परिसरात शिरले. तेथून रामकृष्ण शाळेच्या आवारात व औरंगपुºयात गेले. तेथून चितळाने पुन्हा हव्याप्र मंडळ परिसर गाठला. अखेर जलतरण तलावाजवळ चितळाला पकडण्यासाठी वनकर्मचाºयांनी सापळा रचला. सर्वांनी एकाच वेळी त्याच्या अंगावर झेप घेऊन त्याला पकडले. चितळाला पकडण्यासाठी रेस्क्यू पथकाला तासभरानंतर यश आले. चितळाला पकडल्यानंतर त्याला वडाळी येथे ठेवण्यात आले असून, त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले होते.
शहरात चितळ शिरले, रेस्क्यूची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:29 IST
चितळ शहरात शिरल्याच्या प्रकाराने नागरिकांचे शुक्रवारी मनोरंजन झाले. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात वनविभागाच्या रेस्क्यू पथकाची चांगलीच दमछाक झाली.
शहरात चितळ शिरले, रेस्क्यूची दमछाक
ठळक मुद्देहव्याप्र मंडळ परिसर : तासभरानंतर पकडण्यात आले यश