लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. दोन दिवसांनी गौरीचे आगमन होणार आहे. देवपूजेसाठी उदबत्ती वापरण्याची प्रथा आहे. सणासुदीत अगरबत्ती विक्रीचे प्रमाण वाढणार आहे. या पार्श्वभूमिवर बाजारपेठेत सर्वत्र माफक दरात चायनीज उदबत्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, चायनीज उदबत्ती ही घातक किटकनाशके, अनधिकृत रासायनिकांचा वापर करून तयार करण्यात आली असून ती आरोग्यास घातक असल्याने देवपूजेसाठी वापरु नका, असे आवाहन विविध सामाजिक संस्थांनी केले आहे.भारतात उदबत्ती, धूपबत्त्यांची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे चीनने भारतात आरोग्यास घातक असलेल्या अगरबत्त्या निर्यात केल्या आहेत. चायनीज अगरबत्ती, धूप हे ब्रांडेड नसले तरी ते भारतीय ब्रांडेड कंपन्यांच्या तुलनेत अतिशय स्वस्त दरात विकले जात आहे.आर्कषक पॅकिंग आणि सुवासिक असल्याचा दावाही चायनीज उदबत्त्या, धूपबाबत केला जात आहे. त्यामुळे अलिकडे उत्सव, सणांचे निमित्त साधून चायनीज उदबत्ती, धूपने अनेकांच्या देवघरात प्रवेश केला आहे. याच्या धुरामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी हेळसांड केली जात आहे. चायनीज अगरबत्ती, धूप वापराकडे कल वाढत असल्याने ग्रामीण भागातीेल रोजगारावर गंडातर येत आहे. चिनने सुरू केलेला हा घातक गोरखधंदा आरोग्यास घातक ठरणारा असल्याने तो हाणून पाडणे आवश्यक आहे. पानटपºया, रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध या घातक अगरबत्त्यांच्या विक्रीवर निर्बंध आणण्याची गरज आहे.‘बीटीआरए’ प्रयोगशाळेत चाचणीबॉम्बे टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन(बीटीआरए)च्या प्रयोगशाळेत चायनीज अगरबत्ती, धूपची चाचणी मागील आठवड्यात करण्यात आली आहे. यात ‘सिंट्रोनेला’ अस्तित्वात नसून फेनोबुकार्ब हे कार्बामेट हे किटकनाशक वापरण्यात येते. फेनोबुकार्ब हे घातक किटकनाशक असल्याचे सर्वदूर प्रसिद्ध आहे. फेनोबुकार्ब धूर श्वासावाटे शरीरात गेल्यास डोळ्यांची व त्वचांची जळजळ, अस्वस्थता निर्माण होते. अतिघाम येणे, मध्यवर्ती मज्जासंस्थेची उदासिनता किंवा पोटदुखीसारखे आजार बळावतात, असे ‘बीटीआरए’चे तंत्रज्ज्ञ निशांत पाटील यांनी चाचणीअंती स्पष्ट केले आहे.फेनोबुकार्ब’चा धूर मानवासाठी घातक आहे. त्यामुळे अन्नावरील वासना उडणे, अतिसार, उलट्या, डोकेदुखी, सर्दी, डोळ्यांतून पाणी येणे, श्वास वाहिन्यांमध्ये अडथळा आदी विकार मनुष्यास जडतात.- जितेंद्र अचिंतलवार, वैद्यकीय अधिकारी, अमरावती.
चायनीज उदबत्ती आरोग्यास घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 21:46 IST
सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. दोन दिवसांनी गौरीचे आगमन होणार आहे. देवपूजेसाठी उदबत्ती वापरण्याची प्रथा आहे.
चायनीज उदबत्ती आरोग्यास घातक
ठळक मुद्देदेवपूजेसाठी होऊ नये वापर : ठिकठिकाणी अत्यल्प दरात उपलब्ध