शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातल्या राजुरा बाजारच्या मिरचीला सुगीचे दिवस; परदेशात प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 10:41 IST

विदर्भाचा कॅलिफोर्निया वरूड तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी मिरचीची अधिक क्षेत्रात लागवड केली. सध्या या मिरचीला परदेशात मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे.

ठळक मुद्देरोजगारात वाढ बाजारपेठेत अडीच हजार क्विंटलची आवक

संजय खासबागेअमरावती : विदर्भाचा कॅलिफोर्निया वरूड तालुक्यात संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट आहे. त्याला पर्याय म्हणून यंदा शेतकऱ्यांनी मिरचीची अधिक क्षेत्रात लागवड केली. सध्या या मिरचीला परदेशात मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे. परिणामी राजुराबाजार येथील प्रसिद्ध बाजारपेठेत हिरव्या मिरचीची आवक वाढली आहे.मागील दोन वर्षांत मिरचीचे उत्पादन कमी झाले. यंदा रोगराई नसल्याने लागवड कमी असताना मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे. राजुराबाजार येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मिरची बाजारपेठेत दिवसागणिक दोन ते अडीच हजार क्विंटल मिरचीची आवक होत आहे. उत्पादकांना २५ ते २६ रुपये प्रतिकिलोप्रमाणे भाव मिळत आहे. या बाजारपेठेत परतवाडा, चांदूर बाजार, आर्वी, आष्टी, काटोल, नरखेड, जलालखेडा, मध्यप्रदेशातील मुलताई, पांढुर्णा या परिसरातून शेतकरी मिरची विकण्यासाठी येतात.वरूड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार असलेल्या राजुरा बाजार मिरची बाजारात परवानाधारक १८९ व्यापारी, ५६ अडते, दोन मापारी, ९३ हमाल आणि एक वखारीवाला आहे. हजारो मजुरांच्या हाताला काम देणारी ही बाजारपेठ आहे. हंगामात दिवसागणिक २० ते २५ हजारांपर्यंत कृषी मालाचा सेस बाजार समितीला मिळत असते. तर वाहतूकदार व ट्रक चालकांनादेखील वेळेत माल पोहचता केल्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.एका रात्रीत कोट्यवधींचा व्यवसायविदर्भात रात्रीतून चालणारी एकमेव बाजारपेठ असून येथे सायंकाळी ७ वाजता सुरू होणारा बाजार मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत सुरू असते. एका रात्रीत या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होते. व्यापाऱ्यांकडून नगदी रक्कम दिली जात असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी ताटकळत बसावे लागत नाही.अरब राष्ट्रातही प्रसिद्धराजुरा बाजार येथील मिरची बाजारातून कोलकाता, मुंबई, दिल्ली या मोठ्या शहरांसह राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालसह देशाच्या कानाकोपऱ्यात येथील शेतकऱ्यांचा माल पाठविण्यात येतो. यासोबतच पाकिस्तान, बांगलादेश, दुबई, सौदी अरेबियासह अरब राष्ट्रात येथील मिरची प्रसिद्ध असल्याने व्यापारी मिरचीची निर्यात करतात.यंदा मिरचीची प्रत व भाव चांगला आहे. मात्र ती वेळेत पोहचविणे जिकरीचे काम आहे. रेल्वेने प्राधान्यक्रम देऊन वाहतूक झाल्यास राजुरा बाजारच्या बाजारपेठेचा विकास होऊ शकतो, स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे.- अनिल चांडक,मिरची व्यापारी, राजुरा बाजार

टॅग्स :agricultureशेती