गजानन मोहोड अमरावतीस्वच्छता व आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी अगदी गावपासून ते राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. ‘स्वच्छ भारत हे मिशन साध्य करण्यासाठी बालकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. यासाठी १४ नोव्हेंबर या बालदिनापासून ‘बाल स्वच्छता मोहीम’ सर्व शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत हे अभियान सुरु राहील. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी शिक्षकांवर सोपविली आहे. याच मोहिमेसोबत प्रत्येक शाळेमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र वापरण्यायोग्य स्वच्छतागृह उपलब्ध करुन देण्याबाबत शासकीय यंत्रणेस निर्देश दिले आहे. तसेच इतर घटकांना या कामी योगदान देण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.शाळा या शिक्षणाचे केंद्रबिंदू आहेत. पालक, समाज यांना बालकांच्या माध्यमातून स्वच्छता, आरोग्य व निटनेटकेपना याबाबतचा संदेश पोहचवता येईल, अशी आशा शिक्षण विभागाला आहे. याकामी बालकांच्या माध्यमातून त्यांच्या घरांमध्ये भावंडे, त्यांचे सवंगडी यांच्यामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती होऊ शकते यासाठी विद्यार्थ्यांचे विविध गट, यामध्येही शाळा आरोग्य गट यांच्यामार्फत आरोग्य व स्वच्छतेविषयक विविध उप्रमांची अंमलबजावणी त्या अनुशंगाने बालकांना वैयक्तिक स्वच्छता, त्यांचे घर, शाळा व सभोवतालचा परिसर स्वच्छ व निटनेटका ठेवण्याचे पटवून देण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये मलामूलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, हात धूण्याची जाग, पिण्याच्या पाण्याची सुविधा, नियमित स्वच्छता व आरोग्यविषयक निगा व देखभाल याबाबी असणे आवश्यक आहे.स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता व त्याद्वारे शाळांमध्ये आरोग्यदायी व प्रफुल्ल वातावरण तयार होऊ शकेल त्यामुळे बालक व त्यांचे कुटुंब यांच्या मध्येही आरोग्यविषयक चांगल्या सवयी रुजन्यास मदत होईल. आजाराचे प्रमाण कमी होऊन बालकांच्या उपस्थितीमध्ये वाढ होईल त्याची संपादणूक पातळी वाढेल आणि खऱ्या अर्थाने बालकांचे शैक्षणिक समानतेचे समावेश होईल आणि याचा राष्ट्र विकासामध्ये व आर्थिक वृध्दी होण्यासाठी हातभार लागणार आहे.
सर्व शाळांमध्ये राबविली जाणार ‘बाल स्वच्छता मोहीम’
By admin | Updated: November 15, 2014 01:08 IST