शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

धारणीतून शाळकरी मुलींचे अपहरण, अतिप्रसंगाचा प्रयत्न

By admin | Updated: December 18, 2015 00:17 IST

येथील सरकारी दवाखान्याजवळून तीन शाळकरी मुलींना बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास पळवून नेण्यात आले.

तिघांना अटक : पोलीस ठाण्यात जमाव, लव्ह जिहादचा आरोपधारणी : येथील सरकारी दवाखान्याजवळून तीन शाळकरी मुलींना बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास पळवून नेण्यात आले. या अपहृत मुलींना कोलखास येथे नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. बुधवारीच सायंकाळी ५.३० च्या सुमारास त्यांना धारणी येथे परत सोडण्यात आले. भेदरलेल्या अवस्थेतच तीनपैकी एका मुलीने धारणी पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून तीन आरोपींना तत्काळ अटक केली. अन्य एका आरोपीचा शोध चालविला आहे. विशिष्ट धर्मीय तरुणांनी आदिवासी मुलींना पळवून नेऊन त्यांची लैंगिक प्रतारणा केल्याची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपचे काही पदाधिकारी गुरुवारी दुपारी ३ वाजतादरम्यान धारणी पोलीस ठाण्यात पोहाचले. आरोपींना तत्काळ अटक करावी. हा प्रकार लव्ह जिहादमध्ये मोडणारा आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला. विहिंपचे आप्पा पाटील, भाजपच्या प्रियम चौकशे, हिरालाल मावस्कर आदींनी पोलिसांना धारेवर धरले. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी ग्वाही एसडीपीओंकडून मिळाल्यानंतर तणाव निवळला.याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, अटक केली नाही, असा संभ्रम झाल्याने काही संघटना पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांना वस्तुस्थिती समजून सांगण्यात आली. आरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे.-शिवानंद तामगाडगे,उपविभागीय पोलीस अधिकारी, अचलपूर.विशिष्ट धर्मिय तरुणांनी हिंदू मुलींची केलेली लैंगिक प्रतारणा निंदणीय असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. पालकांनीही आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवणे तितकेच गरजेचे आहे.- प्रियम चौकशे,जिल्हाध्यक्ष, भाजप महिला आघाडी.हिंदू मुलींना पळवून नेल्यानंतरही काही संघटना त्यांच्या समर्थनार्थ उभ्या राहणे अतिशय संतापजनक आहे. ही घटना केवळ अपहरण नसून लव्हजिहादचा प्रकार आहे. आरोपींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी. -आप्पा पाटील,नेते ,विहिंप.आदिवासी बांधवांमधील अन्यायामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदाही घेतला जात आहे. विविध प्रलोभणे दाखवत मुलींची झालेली छेडखानी ही निषेधार्ह बाब आहे.- हिरालाल मावस्कर,आदिवासी नेते, धारणी.शाहरुखकडून लगट करण्याचा प्रयत्नतक्रारकर्ती १५ वर्षीय मुलगी येथील एका शाळेत शिक्षण घेते. तिच्या शेजारी राहणाऱ्या दोन मुली तिच्या मैत्रिणी असून आरोपी शाहरुख हा त्यातील एका मुलीचा मित्र असल्याचे या मुलीने बयाणात सांगितले आहे. घराशेजारी राहणाऱ्या तिच्या एका मैत्रिणीच्या घरासमोर शाहरुख हा नेहमीच चकरा मारतो. त्याने आपल्याशी अनेक वेळा लगट आणि मैत्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण त्याला दाद दिली नाही. मोसीन, वसीम सौदागर या अन्य दोघांनासुद्धा आपण शाहरुख सोबत पाहिल्याचे या अल्पवयीन मुलीचे म्हणणे आहे.