शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदरा पर्यटनस्थळ गेले खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 14:39 IST

विदर्भाचे नंदनवन असलेले चिखलदरा पर्यटनस्थळावरील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देपर्यटकांमध्ये संताप सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, पालिका झोपेत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेले चिखलदरा पर्यटनस्थळावरील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका प्रशासन आंधळ्याचे सोंग घेऊन असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.विदर्भाची एकमेव पर्यटनस्थळ असे नावलौकिक असलेले चिखलदरा रस्ता, पाणी, वीज या पायाभूत सुविधांपासून आजही वंचित असल्याचे सत्य आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी शासनाकडून पालिका सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला जातो. प्रत्यक्षात मर्जीतील अनावश्यक कामावरच तो खर्च केला जात असल्याचे सत्य आहे. ‘ठेकेदारांची नगरपालिका’ अशी बदनामीकारक ओळख पालिकेला आहे. त्यामुळे विकासकामांचा चिखलदऱ्यात बट्ट्याबोळ झाला आहे. एकमेव प्रमुख मार्गावर गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे बसले पडले असताना, त्यावर मुरुम किंवा तात्पुरती डागडुजी करण्याचे धाडस नगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखविले नाही. आंतरराज्य महामार्गाशी हा मार्ग जोडला गेला असताना, त्यावर दुरुस्ती-देखभाल खर्च लाखो रुपये दाखवण्यात आला. तरीसुद्धा अपघाताला आमंत्रण देणारे रस्ते पर्यटकांच्या जिवावर बेतले आहेत.

मुख्य चौकाची दैनावस्थापाच हजार लोकसंख्या असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला केवळ एक मार्ग आहे. त्यावरही दोन ते तीन फुटापर्य$ंत खड्डे आहेत. मुख्य चौकात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. एकोणीस नगरसेवक दिवसभर किमान दहा वेळा या रस्त्यावरून जातात. त्यांना खड्ड्यांचे गचके जाणवत नाहीत का, हे मात्र कोडे आहे.

पर्यटक कर नावाची लूटचिखलदरा पर्यटनस्थळावर वीजपुरवठ्याचा लपंडाव नेहमीची बाब झाली आहे. उन्हाळ्यात दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे सत्य आहे. कालपर्यंत विविध पॉइंटवरील खड्ड्यात गेलेले रस्ते दुरुस्त होत नसताना, आता मुख्य चौकासह रस्त्यावर पडलेले खड्डे एक ना धड भाराभर चिंध्या म्हणायची वेळ या पर्यटन स्थळाच्या विकासाबद्दल आली आहे. कुठलीही सुविधा मिळत नसताना घेतला जाणारा पर्यटक कर ही शुद्ध लूट ठरली आहे.

सदर मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. पर्यटकांची गैरसोय पाहता त्यावर मुरुम टाकण्यात येईल.- सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी, न.प. चिखलदरा

खड्ड्यात मुरुम टाकल्यास चिखल होईल. यामुळे पाऊस उघडण्याची वाट पाहत आहोत.- नितीन देशमुखउपविभागीय अभियंता सा.बा. विभाग, चिखलदरा

टॅग्स :Chikhaldaraचिखलदरा