शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे चिखलदरा पर्यटन महोत्सव रद्द !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 05:01 IST

  अनिल कडू     लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : बहिरम यात्रेपाठोपाठ चिखलदरा पर्यटन महोत्सव रद्द करण्यात आला आहे. प्रशासनाकडून ...

ठळक मुद्देआदिवासी कलेला दुसऱ्या वर्षीही रसिक मुकणार

  अनिल कडू    लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : बहिरम यात्रेपाठोपाठ चिखलदरापर्यटन महोत्सव रद्द करण्यात आला आहे. प्रशासनाकडून याकरिता कोरोनाचे कारण पुढे करण्यात आले आहे.राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वात २०, २१ व २२ नोव्हेंबर १९९२ ला चिखलदरा येथे पहिला पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला.  गाविलगडच्या दर्शनी भागात आदिवासी कला महोत्सवाच्या नावावर आयोजन करण्यात आल्यामुळे तो गाविलगड महोत्सव या नावाने ओळखला गेला. महोत्सवाकरिता मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे त्यावेळी चिखलदऱ्यात मुक्कामी होते. त्यानंतर तब्बल १४ वर्षांचा खंड पडला. पुढे २५ ते २७ फेब्रुवारी २००६, २३ ते २५ डिसेंबर २००६ आणि २३ ते २५ डिसेंबर २००७ दरम्यान  चिखलदरा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला. तीन वर्षांच्या ब्रेकनंतर २८ ते ३० जानेवारी २०११ दरम्यान आणि त्यानंतर सन २०१५, २०१६ व २०१७ मध्ये पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले गेले. दरम्यान, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पर्यटनाकडे लक्ष पुरविले. जिल्हाधिकाऱ्यांसह पर्यटन विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठकाही घेतल्या. यामुळे यंदा चिखलदरा पर्यटन महोत्सवाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण, कोरोनाने त्यात मोडता घातला. या महोत्सवाची दरवर्षी कलाप्रेमींची प्रतीक्षा असते. ती  यंदाही पूर्ण होणार नाही.

टॅग्स :Chikhaldaraचिखलदराtourismपर्यटन