जागतिक पर्यटन दिन : लाखो पर्यटक देतात दरवर्षी भेटलोकमत दिन विशेषनरेंद्र जावरे चिखलदराविदर्भाचे नंदनवन आणि जागतिक पातळीवरील वाघांची भूमी असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. मात्र शासनाचे या पर्यटक केंद्रावर दुर्लक्ष असल्याने विकास खुंटला आहे. निसर्गाने वैभवसंपन्न असलेला परिसर डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला आहे.समुद्र सपाटीपासून ३६०० फूट उंच असलेले चिखलदरा पर्यटन स्थळाला महाभारतासह इतिहासाचा वारसा लाभला आहे. निसर्गाने भरभरून दिलेल्या मेळघाटच्या भूतलावर अनेक पर्यटनस्थळे असून ती नैसर्गिकरीत्याच वैभवसंपन्न आहेत. इंग्रज कॅप्टन रॉबीनसन्सने चिखलदरा पर्यटन स्थळाचा शोध थंड हवेचे ठिकाण म्हणून लावला. दीडशे वर्षे राज्यकर्ते इंग्रज येथे निवांत राहण्यासोबत जंगलात शिकारीसाठी या परिसराचा वापर करत असत. चिखलदरा पर्यटन स्थळाचा विकास शून्य असल्याने येथे येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या आता बोटावर मोजण्याएवढी राहली आहे. विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ असताना संपूर्ण महाराष्ट्रालाच या स्थळाची ओळख नसल्याची लाजीरवाणी बाब आहे.निसर्गाची किमयाचिखलदरा पर्यटन स्थळ एक थंड हवेचे ठिकाण म्हणून नावलौकिक असले तरी येथे चेरापुंजी सारख्या धो-धो कोसळणारा पाऊस तर क्षणात अंगावर शहारे आणणारे तुषार विलोभणीय दृश्य, उंच उंच कपाटीत वसलेली आदिवासींची टुमदार स्वच्छ घरे, क्षणात ऊन तर लगेच दाट पांढऱ्या शुभ्र धुक्यात हरविलेले हे विलोभनीय दृश्य जणू धरतीवर स्वर्गाचा अद्भूत आनंद देणारा ठरतोय, त्यालाच मेळघाटच्या उंच शिखरावर बसलेले चिखलदरा पर्यटन स्थळ असा संबोेधले जाते.इतिहास अन् महाभारतकालीन खुणाचिखलदरा पर्यटनस्थळाचा शोेध इंग्रजांनी लावला असताना येथे महाभारताची आठवण करून देणारी विराटराजाची विराट नगरी आपल्या अस्तित्वाच्या खुणा आजही जपवून आहे. भिमाने किचकाचा वध केल्यावर त्यांचे रक्ताने माखलेले हात ज्या कुंडात धुतले होते तो भीमकुंड येथील महत्त्वाच्या पॉईन्ट पैकी एक आहे. दीड हजार फूट उंचावरून कोसळणारा धबधबा डोेळ्याचे पारणे फेडणारा ठरतो. तर इतिहासाची लक्ष असलेला गावीलकड किल्ला, शस्त्र निर्मितीचा कारखाना होता. इतिहासात येथे खासशस्त्रासाठी लागणारा दारुगोळा तयार केला जात होता. आदिवासींची कुलदैवत जनादेवीचे मंदिर येथील देवीपॉर्इंटवर आहे. तेथे असलेली वाघ गुफा आता बंद झालेली आहे. वाघाचे दर्शन पूर्वी अनेकदा होत असल्याने पूर्वज सांगतात. वन उद्यान, हरिकेन पॉईंट, मोझरी पॉईन्ट, एका सादाला प्रति पाच साद देणारा पंचबोल, कॉफीचे मळे आदी पर्यटकांना आकर्षित करण्यासारखे बरेचसे पॉइन्ट येथे आहेत. मात्र शासनाचे कायम दुर्लक्ष असल्याने इथला विकास खुंटला आहे. व्याघ्र सफारीचा आनंदचिखलदरा पर्यटन स्थळाससह सिपना वन्यजीव विभागाच्या सेमाडोह जंगल सफारीला दीड महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. पर्यटकांना आता व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारीचा आनंद घेता येत आहे. वाघोबाचे दर्शन होईल, या अपेक्षेने पर्यटक जंगलात जातात. जंगलाच्या राजाचे दुर्लभ दर्शन होईल, या उमेदीवर असले तरी वाघाची भूमी घनदाट आहे. वृक्षतोडीच्या घटना थांबविल्यास पर्यटनाचा ऱ्हास व वाघोबाचे दर्शन सहन होणार एवढे मात्र निश्चित.
चिखलदरा पर्यटन अन् ‘वाघांचा’ मेळघाट खुणावतोय
By admin | Updated: September 27, 2015 00:21 IST