शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदरा, खंडुखेड्यात तुफान गारपीट, पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 05:00 IST

गुरुवारी दुपारी अचानक काळेकुट्ट ढग दाटून आले. विजांच्या कडकडाटात अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर १० ते १५ मिनिटापर्यंत बोराच्या आकाराचे एवढ्या गारांचा सडा कोसळू लागला.  वन उद्यान, पांढरी, रेंजर कॉलेज व जंगलात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. नगरपालिकेचा वार्ड असलेल्या पांढरी भागात गारांचे थर दोन तासांपेक्षा अधिक वेळ साचून होते.

ठळक मुद्देपरिसर गारठला : चांदूर, धामणगाव, नांदगावात अवकाळी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे व चिखलदरा तालुक्यात गुरूवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने वातावरणात कमालीचा गारवा पसरला. खुंटीवरील स्वेटर, मफलर पुन्हा निघाले. सायंकायपर्यंत वातावरणात गारवा होता. चिखलदरा, खंडूखेडा येथे गार चिखलदरा : येथे गुरुवारी दुपारी २:२० वाजताच्या दरम्यान बोराच्या आकाराच्या गारा कोसळल्या. तालुक्यातील खंडूखेडा येथे दुपारी १२ च्या सुमारास तुफान गारपीट झाली. पर्यटनस्थळी दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पर्यटन स्थळ गारठले आहे. गुरुवारी दुपारी अचानक काळेकुट्ट ढग दाटून आले. विजांच्या कडकडाटात अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर १० ते १५ मिनिटापर्यंत बोराच्या आकाराचे एवढ्या गारांचा सडा कोसळू लागला.  वन उद्यान, पांढरी, रेंजर कॉलेज व जंगलात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. नगरपालिकेचा वार्ड असलेल्या पांढरी भागात गारांचे थर दोन तासांपेक्षा अधिक वेळ साचून होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटक सुद्धा रात्रंदिवस गरम कपडे घालण्यासह दिवसासुद्धा शेकोट्या पेटवून बसले आहेत. नांदगाव तालुक्यात पाऊस.तालुक्यात कनी मिझार्पूर, नांदगाव खंडेश्वर, शिवणी रसुलापुर व परिसरातील गावात गुरूवारी सकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडला. काही गावात तुरळक प्रमाणात गार पडली. हरभरा कापणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली. काही शेतक-यांनी सवंगनी केलेला हरभरा जमिनीवर पडून होता. गंजी झाकण्यासाठी शेतक-यांना धावपळ करावी लागली.चांदूर रेल्वेत पावसाच्या सरी चांदूर रेल्वे : येथे गुरुवारी दुपारी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. शहरात पावसाळी वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. गहू, हरभरा, भाजीपाला पिकांना पाऊस व वातावरणापासून धोका निर्माण झाला आहे.धामणगाव तालुक्याला अवकाळीधामणगाव रेल्वे : सहा  वर्षांपासून तालुक्यातील रब्बी हंगामातील  पिकाला अवकाळीचा फटका बसत असून गुरुवारी झालेल्या अवकाळीमुळे सोंगणी केलेला एक  हजार हेक्टरातील  हरभरा जमीनदोस्त झाला तर तीनशे हेक्टरातील गहू झालेल्या तुरळक गारपीट व वादळी पावसाने झोपला आहे. शेंदुरजनाघाट परिसरात गारपीटशेंदूरजनाघाट : परिसरात गुरुवार दुपारी ३ वाजता गारपिटीसह पाऊस पडला. यामुळे गहू, चणा, एरंडी या पिकांसह संत्रापिकाचे नुकसान झाले. दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतातूर झाले

चिखलदरा येथे वीज पडून बैल ठार  चिखलदरा : गुरुवारी दुपारी झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यात अतिदुर्गम असलेल्या बिच्छूखेडा, खंडुखेडा आणि भुत्रम येथे गारपीटमुळे मोठे नुकसान आहे. भुत्रुम या गावात गुरुवारी दुपारी २.१५ च्या सुमारास  वीज पडून बैल दगावल्याची माहिती चिखलद-याच्या तहसीलदार माया माने यांनी दिली. तो बैल जंगली सोमजी इवनाते यांच्या मालकीचा होता.

टॅग्स :Rainपाऊस