शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

राज्यातील पर्यटन महोत्सवाच्या यादीतून चिखलदरा बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:14 IST

वगळले : पर्यटन संचालनालयाचे चिखलदऱ्याकडे दुर्लक्ष अनिल कडू परतवाडा (अमरावती) : राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत यंदा राज्यातील २० ठिकाणी ...

वगळले : पर्यटन संचालनालयाचे चिखलदऱ्याकडे दुर्लक्ष

अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत यंदा राज्यातील २० ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येत आहेत. या पर्यटन महोत्सवाच्या यादीतून चिखलदऱ्याला मात्र वगळण्यात आले आहे.

चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन. मेळघाटच्या कुशीतील थंड हवेचे ठिकाण. समृद्ध वनस्पतींनी नटलेले आणि निसर्ग सौंदर्याने बहरलेले व कोरकू आदिवासी संस्कृतीचा वारसा लाभलेले विदर्भातील एकमेव ठिकाण. पर्यटन संचालनालयाने पर्यटन महोत्सवाच्या यादीतूनच चिखलदऱ्याला वगळल्यामुळे हा वारसा आणि सौंदर्य पाहण्याच्या संधीस पर्यटक मुकणार आहेत.

चिखलदरा येथे १९९२ पासून पर्यटन महोत्सवाला सुरुवात झाली. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वात २०, २१ व २२ नोव्हेंबर १९९२ रोजी चिखलदरा येथे पहिला पर्यटन महोत्सव घेतला गेला. याकरिता स्वत: सुधाकरराव नाईक चिखलदऱ्यात मुक्कामी होते. पर्यटन विभागाचा यात सक्रिय सहभाग राहिला. तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने चिखलदरा पर्यटन संचालनालयाच्या नकाशावर आले. यानंतर तब्बल १४ वर्षांनी २५ ते २७ फेब्रुवारी २००६, २३ ते २५ डिसेंबर २००६ आणि २३ ते २५ डिसेंबर २००७ ला चिखलदरा पर्यटन महोत्सव पार पडला. पुढे तीन वर्षांच्या ब्रेकनंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्याने २८ ते ३० जानेवारी २०११ दरम्यान चिखलदरा पर्यटन महोत्सव घेतला गेला. २०११ नंतर २०१५, २०१६ व २०१७ अशा लागोपाठ वर्षांत पर्यटन महोत्सव घेतला गेला. २०१८ आणि २०१९ मध्ये परत चिखलदरा पर्यटन महोत्सव घेतला गेला नाही.

दरम्यान, राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पर्यटनाकडे लक्ष पुरविले. जिल्हाधिकाऱ्यांसह पर्यटन विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठका घेतल्या. संवाद साधला. यातून चिखलदरा पर्यटन महोत्सवाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, पर्यटन संचालनालयाकडूनच पर्यटन महोत्सवाच्या यादीतून चिखलदरा वगळले गेल्यामुळे परत एकदा पर्यटकांच्या पदरी निराशा आली आहे.