शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या विमानास बेलोरा विमानतळावर परवानगी नाकारली, अमरावतीचा दौरा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 16:33 IST

खराब वातावरणामुळे नागपूर विमानतळाच्या प्रबंधकाकडून मुख्यमंत्र्यांचे विमान बेलोरा विमानतळावर उतरविण्यास नकार मिळाला.

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवार, १० मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई येथून शासकीय विमानाने अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर येणार होते. तसा मुख्यमंत्र्यांचा नियोजित दौरादेखील होता. मात्र, खराब वातावरणामुळे नागपूर विमानतळाच्या प्रबंधकाकडून मुख्यमंत्र्यांचे विमान बेलोरा विमानतळावर उतरविण्यास नकार मिळाला. त्यामुळे आकाशात घिरट्या मारून मुख्यमंत्र्याचे विमान परत गेले. मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

बहुप्रतीक्षेनंतर अमरावतीत नवनिर्मित जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वास्तूचा लोकार्पण सोहळा शनिवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश विजया ताहिलरमाणी होत्या. सन्माननीय अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, प्रदीप देशमुख, सुनील शुक्रे, विजय आंचलिया, तर विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील उपस्थित होते. या अवस्मरणीय सोहळ्याचे प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ते येणार असल्याने गत आठवडाभरापासून प्रशासनाने जय्यत तयारी चालविली. 

बेलोरा विमानतळावर शनिवारी सकाळी १० पासून पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आ. सुनील देशमुख, आ. रवि राणा, विभागीय आयुक्त पीयूष गोयल, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिलाष कुमार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी हजर होते. बेलोरा विमानतळाच्या प्रबंधकांनी मुंबई विमानतळाशी संपर्क साधला असता, सकाळी पावणेदहाच्या सुमारास शासकीय विमान मुख्यमंत्र्यांना घेऊन निघाल्याची माहिती त्यांना मिळाली. सकाळी ११ वाजताच्या सुमारास विमानाने आकाशात घिरट्या घातल्या, पण ते धावपट्टीवर उतरले नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्याना घेऊन आलेल्या विमानाच्या वैमानिकासोबत एटीएस टॉवरअभावी बेलोरा विमानतळाहून संपर्क साधता आला नाही. मात्र, हे विमान   नागपूर विमानतळावर उतरल्याचे कालांतराने प्रशासनाने स्पष्ट केली. त्यामुळे उद्घाटन सोहळा तब्बल तासभर विलंबाने सुरू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द झाल्याचे कळताच उद्घाटन सोहळ्यातील उपस्थितांमध्ये काहीअंशी नाराजी जाणवली, हे विशेष. 

विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमावरही विरजणमुख्यमंत्र्याच्या हस्ते नवनिर्मित न्यायवैद्यक विभागीय प्रयोगशाळा इमारतीचे लोकार्पण, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे २०० खाटांचे बांधकाम आणि चित्रा चौक ते नागपुरी गेट दरम्यान उड्डाणपुलाचे भूमिपूजन केले जाणार होते. मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आ. सुनील देशमुख आदींच्या उपस्थितीत हे कार्यक्रम आटोपले.

टॅग्स :AmravatiअमरावतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस