शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- मुख्यमंत्र्यांच्या मामेभावाची स्थायी समिती अध्यक्षपदी निवड, जल्लोषामध्ये नोटा उधळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 20:41 IST

मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोटी यांच्या विजयी मिरवणुकीत पैशांचा वर्षाव करण्यात आला.

अमरावती- मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोटी यांच्या विजयी मिरवणुकीत पैशांचा वर्षाव करण्यात आला. महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी शुक्रवारी कलोटी बिनविरोध निवडून आलेत. त्यानंतर महापालिका आयुक्तांच्या दालनाजवळून त्यांची विजयी मिरवणूक निघाली. या मिरवणुकीदरम्यान पैसै उडविण्याचा हा प्रकार घडला. या प्रकारामुळे भाजपाचा हाच का पारदर्शक व गतिमान कारभार, असा सवाल उपस्थित करण्यात आला. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या मामेभावाला कोण हटकणार, अशी प्रतिक्रियासुद्धा उमटली. कलोटींच्या या विजयोत्सवाला या प्रकाराने भलतेच वळण मिळाले. या मिरवणुकीत महापौरांसह सभागृहनेता व भाजपच्या शहर अध्यक्षांसह बडे पदाधिकारी, नगरसेवक सहभागी झाले होते.

फेब्रुवारीमध्ये स्थायी समितीतून बाहेर पडल्यानंतर कलोटी यांचा पुनर्प्रवेश झाल्याने  तेच स्थायी समितीचे सभापती बनतील, अशी शक्यता होती. शुक्रवारी अपेक्षेनुरूप त्यांच्याविरुद्ध अन्य सदस्यांचे नामांकन न आल्याने त्यांची अविरोध निवड झाली. शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास विवेक कलोती सभागृहाबाहेर पडले. भाजयुमोचे शहर अध्यक्ष असलेले कलोती सभापती बनल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर खांद्यावर उचलून घेतले. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावरून ओवाळून २० रुपयांच्या अनेक नोटा उधळल्या. त्यानंतर राजकमल चौकातही १० च्या नोटांचे बंडल उधळण्यात आले. 

विवेक कलोटी यांच्या मिरवणुकीदरम्यान उधळल्या गेलेल्या नोटा बनावट, खेळण्यातील होत्या. मीच तो प्रकार बंद करण्यास बजावले. आमच्याकडे उधळायला पैसे नाहीत.- जयंत डेहनकर, शहराध्यक्ष, भाजप

एकीकडे महाराष्ट्रात कास्तकार मरताहेत. बेरोजगारी वाढली आहे. अशा विपरीत परिस्थितीत विजयी मिरवणुकीदरम्यान पैसे उडविणे ही शेतकरी-कष्टकºयांची थट्टा आहे. भाजपच्या स्थायी समिती सभापतींना हे शोभणारे नाही. काँग्रेसतर्फे आम्ही या कृत्याचा निषेध करतो. - बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता, महापालिका