शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

परतवाडा परिसरात चेन्नईच्या ताडीचा गूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:13 IST

चव जरा वेगळीच : रस्त्यावर थाटली दुकाने परतवाडा : चहासह इतर काही पदार्थांमध्ये साखरेऐवजी गूळ वापरणाऱ्यांचे प्रमाण शहरी आणि ...

चव जरा वेगळीच : रस्त्यावर थाटली दुकाने

परतवाडा : चहासह इतर काही पदार्थांमध्ये साखरेऐवजी गूळ वापरणाऱ्यांचे प्रमाण शहरी आणि ग्रामीण भागात वाढले आहे. अशाच चेन्नई येथील ताडीचा गूळ अचलपूर, परतवाडा या जुळ्या शहरांत विक्रीला आला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी थाटलेली ही गुळाची दुकाने लक्षवेधी ठरली आहेत.

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात गुळाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. कोरोनाकाळात अनेक नागरिक बिनदुधाच्या गुळाच्या चहाकडे वळले. एरवी संक्रांतीला तीळगूळ तयार करण्यासाठी शहरी संस्कृतीत येणारा गूळ आता महिन्याच्या किराणा यादीत परतला आहे. जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील गूळ प्रसिद्ध असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. अशातच चेन्नईसारख्या परराज्यातून आलेल्या ताडीच्या गुळाची चव घेण्यासाठी रस्त्यावरील या दुकानांवर अनेकांची पावले थबकू लागली आहेत.

बॉक्स

चेन्नईचा मुरलीधरन बोलतो मराठीत

चेन्नई येथून ताडीचा गूळ विक्रीसाठी आणणारा मुरलीधरन दोन प्रकारच्या गुळाची विक्री करतो. अष्टमासिद्धी नजीक दिवसभर रस्त्याने ये-जा करणाऱ्या ग्राहकांशी मोडक्यातोडक्या मराठी भाषेत संवाद साधतो. लहान आणि मोठ्या आकारात बांबूच्या टोपलीत या गुळाच्या भेल्या ठेवल्या आहेत. एका ट्रकमध्ये हा संपूर्ण माल भरून सहा ते सात सहकारी विविध ठिकाणी दुकाने थाटून विक्री करीत आहेत.

--------------------