शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाळा, अंगणवाडीतील पाण्याच्या स्रोताची रासायनिक तपासणी; १५ जुलैपर्यंतची डेडलाइन 

By जितेंद्र दखने | Updated: July 4, 2023 19:14 IST

आतापर्यंत जिल्ह्यातील १५७४ शाळा व १८६१ अंगणवाड्यांमधील पिण्याच्या पाण्याचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठविले आहेत.

अमरावती : शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदमार्फत जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यातील पिण्याच्या पाण्याच्या पाणी स्रोताचे नमुने तपासणी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच करण्यात येते. यासाठी १ जून ते ३० जून या कालावधीत सर्व गावे, शाळा, अंगणवाड्यांमधील पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी केल्या जाते. आतापर्यंत जिल्ह्यातील १५७४ शाळा व १८६१ अंगणवाड्यांमधील पिण्याच्या पाण्याचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठविले आहेत.

 झेडपी सीईओ अविष्यांत पंडा यांच्या आदेशावरून व जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभाग प्रमुख श्रीराम कुळकर्णी यांच्या निर्देशानुसार येत्या १५ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. १४ तालुक्यात एकूण २५९८ अंगणवाड्या, १५८६ शाळा आहेत. या ठिकाणी असलेल्या पिण्याच्या पाणी तपासणीसाठी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या नमुने तपासणीची प्रक्रिया ७१ टक्क्यांपेक्षा जास्त झाली असून येत्या काही दिवसात शंभर टक्के तपासणी होणार आहे. यासाठी १५ जुलैची डेडलाइन दिली आहे. दुसऱ्या टप्प्यात जैविक तपासणीया रासायनिक तपासणीचे अहवाल प्राप्त होताच दूषित आढळून आलेल्या पाणीपुरवठा स्रोतांचे शुद्धीकरण केल्या जाणार आहे. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणीची प्रक्रिया आटोपताच पाण्याची जैविक तपासणी सुरू होईल. विद्यार्थ्यांसह जिल्हाभरातील सर्व ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागा मार्फत ही तपासणी मोहीम सुरू असल्याचे जलतज्ज्ञ नीलिमा इंगळे यांनी दिली. 

टॅग्स :AmravatiअमरावतीSchoolशाळा