शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील वाघांच्या ‘कॅरिडॉर’ मार्गाची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 11:48 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पालगतच्या वनक्षेत्रातील वाघांना ये- जा करणे सुकर व्हावे, यासाठी ‘कॅरिडॉर’ निर्मितीच्या अनुषंगाने चाचपणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देवनक्षेत्राशी व्याघ्र प्रकल्पांना जोडणार कृती आराखडा तयारसीमेलगतच्या राज्यांना मेळघाटची कनेक्टिव्हिटी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पालगतच्या वनक्षेत्रातील वाघांना ये- जा करणे सुकर व्हावे, यासाठी ‘कॅरिडॉर’ निर्मितीच्या अनुषंगाने चाचपणी सुरू केली आहे. येत्या काळात मेळघाट व्याघ्र प्रकल्प सीमेलगतच्या राज्यांना जोडले जाईल, अशी तयारी आहे.विदर्भात पेंच, ताडोबा, बोर, मेळघाट, नवेगाव- नागझिरा या पाच व्याघ्र प्रकल्पातील वाघांसाठी वनक्षेत्रातील रस्ते तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मध्यंतरी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या अधिक असल्यामुळे वाढीव वाघांचे नैसर्गिकरीत्या ‘कॅरिडॉर’ निर्माण करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार वनाधिकाऱ्यांनी त्या- त्या भागातील पाहणी केली. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघांसाठी ‘कॅरिडॉर’ निर्माण होण्याची चिन्हे असताना या व्याघ्र प्रकल्पास अन्य वनक्षेत्राशी जोडणे कठीण असल्याची बाब समोर आली. तथापि, नव्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघांसाठी ‘कॅरिडॉर’ निर्मितीकरिता चाचपणी सुरू केली आहे.आठ मार्गाचे ‘कॅरिडॉर’ निर्मितीचा प्रस्तावमेळघाटात वाघांचे ‘कॅरिडॉर’ निर्माण करण्यासाठी मध्यप्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्प, नागपूर जिल्ह्यातील पेंच, मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कान्हा, बैतूल वनक्षेत्र, तर जारीदामार्गे मोर्शी- वरूड वनक्षेत्र, जळगाव-जामोद ते गुजरातचे वडोदरा, मेळघाटचे अंबाबर्वा ते पोहरा- मालखेड जंगलक्षेत्र, मेळघाट ते खंडवा वनक्षेत्र धारणी असा आठ ‘कॅरिडॉर’ मार्ग वाघांचे ये-जा करण्यासाठी निर्मितीचा प्रस्ताव आहे.वाघांना सुरक्षितपणे ये-जा करण्यासाठी कॅरिडॉर निर्मितीचा प्रस्ताव आहे. त्याअनुषंगाने चाचपणी सुरू आहे. लवकरच यासंदर्भात अंतिम निर्णय होईल.- एम.एस. रेड्डी,अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

टॅग्स :Tigerवाघ