अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील रहिमापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चारचाकीचा पाठलाग करून १० पेट्या दारूसाठा जप्त केला तसेच एकाला अटक करण्यात आली. पोलिसांनी शनिवारी ही कामगिरी केली.पोलीस सूत्रांनुसार, ठाणेदार शेख जमील, उपनिरीक्षक कविटकर, कॉन्स्टेबल चंदू खंडार, प्रफुल रायबोले यांच्या पथकाने गोपनीय माहितीवरून कापूसतळणी येथून एमएच २७ बीई १५७६ क्रमांकाच्या पांढºया चारचाकी वाहनाचा पाठलाग केला. विहिगाव फाट्यावर सदर चारचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यापूर्वी २५ हजार रुपये किमतीच्या अवैध दारूच्या १० पेट्या रस्त्यात टाकून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाहनासह एकूण पावणेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.घटनास्थळाहून अब्दुल राजिक अब्दुल खालिक (रा. विहिगाव) याला पोलिसांनी अटक केली. पसार आरोपींची ओळख मो. तौसिफ ऊर्फ अ. रहीम अ. कदीर (रा. मुºहा) अशी पटविण्यात आली. हा मुद्देमाल साबीर अब्दुल बशीर (रा. मुºहा) याच्याकडे घेऊन जात असल्याचे आरोपीने सांगितले. आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा व भादंविचे कलम २७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पाठलाग करून दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST
तालुक्यातील रहिमापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चारचाकीचा पाठलाग करून १० पेट्या दारूसाठा जप्त केला तसेच एकाला अटक करण्यात आली. पोलिसांनी शनिवारी ही कामगिरी केली.
पाठलाग करून दारूसाठा जप्त
ठळक मुद्देपोलीस : १० पेट्या दारू, चारचाकी ताब्यात