शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

माऊलीचे अश्व ठरणार बहिरमचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:02 IST

आषाढी एकादशीला पंढरपूरजवळील वाखरी येथील सोहळ्यात माउलीचे अश्व रिंगण घालतात. माउलीचे तेच अश्व रविवारी बहिरमबुवांच्या चरणी येणार आहेत.

ठळक मुद्देआज रिंगण सोहळा : वाखरीच्या धर्तीवर राहणार सोहळा

वीरेंद्रकुमार जोगी।आॅनलाईन लोकमतअमरावती : आषाढी एकादशीला पंढरपूरजवळील वाखरी येथील सोहळ्यात माउलीचे अश्व रिंगण घालतात. माउलीचे तेच अश्व रविवारी बहिरमबुवांच्या चरणी येणार आहेत. यंदा प्रथमच बहिरम येथे रिंगण सोहळा आयोजित असून, या सोहळ्याविषयी कमालीची उत्सुकता पंचक्रोशीत आहे.विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध असलेली बहिरम यात्रा रंगात आली आहे. रविवारी यात्रा बहरात येणार आहे. प्रथमच होणारा हा रिंगण सोहळा वाखरी पंढरपूरच्या धर्तीवर होणार आहे. यात्रेतील शंकरपटाच्या जागेवर दुपारी दोन वाजता या रिंगण सोहळ्याकरिता पाच एकर जागा तयार करण्यात आली आहे. या रिंगण सोहळयात पंढरपूरचे दोन अश्व, चोपदार आणि बिगर चोपदारसह हजारो वारकरी आणि ३० ते ४० पालखी, दिंड्या रिंगण सोहळ्यात सहभागी होत आहेत. येथे ६ ते १३ जानेवरी दरम्यान भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे. यंदाच्या यात्रेसाठी दुकानदारांनी चढ्या बोलीने लिलावात जागा घेतल्या. याला फूलविक्रीची दुकाने अपवाद ठरली. त्यांना अन्य विक्री करता येणार नाही, असे आयोजकांनी सांगितले.कर्नाटकच्या शिंतोळे सरकारचे अश्वविठ्ठलाची वारी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असताना एकादशीच्या आदल्या दिवशी वाखरी येथे माउलीचा रिंगण सोहळा रंगतो. या रिंगणात धावणारे माऊलीचे अश्व कर्नाटकच्या शिंतोळे सरकार यांचे मालकीचे आहेत. बहिरमच्या यात्रेत हेच माउलीचे अश्व राहणार आहेत. रविवारी सकाळी ते बहिरममध्ये पोहचतील. या यात्रेत हे अश्व प्रथमच येणार असल्याने यात्रेला आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.प्रबोधनाची परंपराबहिरम यात्रेला प्रबोधनाची प्रदीर्घ परंपरा आहे. येथे यात्रा कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा व भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख आदींनी प्रबोधन केले. राष्ट्रसंत व गाडगेबाबा यांनी या बहिरम यात्रेत लोकजागृती केलेली आहे.मातीची भांडी आकर्षणग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी यात्रेची ओळख होती. आता या यात्रेचे स्वरूप बदललले असले तरी ग्रामीण आणि शहरी संस्कृतीला आजही ती हवीहवीशी वाटते. मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील झल्लार गावातील व्यापारी मातीची भांडी विक्रीला आणतात. ही मातीची भांडी यात्रेचे आकर्षण आहे.