शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

आधी १० लाखांनी लुबाडले, मग बळजबरी केली! गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 18:30 IST

आरोपीने ओखळीचा फायदा घेत पीडितेकडून १० लाख लुबाडले इतकेच नव्हे तर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक बळजबरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देपैसे परत करण्यावरून टोलवाटोलवीएका महिलेसह चौघांविरूद्ध गुन्हा

अमरावती : तब्बल १० लाख रुपये लुबाडून एका महिलेचे सर्वस्व लुटल्याची घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी सूरज भजगवरे (२५, माताफैल, बडनेरा), सुनील कैथवास (३५, माताफैल), राज गडलिंग (२५, बडनेरा) व एक महिला अशा चौघांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीनुसार, आरोपी सूरज भजगवरे याने पीडिताला खरेदीसाठी १० लाख रुपये मागितले. मित्र म्हणून तिने त्याला ती रक्कम दिली. १० जानेवारी रोजी ती रक्कम परत देण्याची बतावणी करून सूरज तिला ९ जानेवारी रोजी रात्री १० च्या सुमारास बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक शोषण केले. १० रोजी सकाळी ७ च्या सुमारास तिला घरी सोडले. रक्कम खोलीवर आणून देण्याची बतावणी केली.

काही वेळाने पुन्हा रेल्वे स्टेशनवर रक्कम आणून देण्याची बतावणी करून तिला तेथे बोलावण्यात आले. तेथे बॅगमध्ये पैसे टाकल्याचेदेखील सांगितले. मात्र, ते न दाखविता तो तिला बॅगपासून दूर रेल्वे फाटकाजवळ फोटो काढण्यास घेऊन गेला. तेवढ्या वेळात आरोपी सुनील कैथवास याने आपल्या त्या बॅगमधून ती रक्कम काढून घेतल्याचे पीडिताचे म्हणणे आहे. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यावर बॅग चेक केली असता, त्यात पैसे नसल्याचे लक्षात आल्याने तिने वारंवार सूरजशी संपर्क साधला.

निव्वळ बनवाबनवी

११ जानेवारी रोजी सूरजने राज गडलिंग याच्यासोबत फोनवर बोलायला लावून पैसे आणून देण्याची बतावणी केली. त्यानंतर सूरजने आपण हिंगणघाटपर्यंत आलो आहे. पैसे सोबतच आहेत, अशी बतावणी केली. १३ जानेवारी रोजी सूरजने पीडिताला त्याच्या आईशी फोनवरून बोलायला लावले. काही वेळानंतर तुझे कशाचे पैसे, म्हणून सूरजने फोन कट केला. तेव्हापासून सूरजने पीडिताचा फोन करणे बंद केला. त्यामुळे पीडिताने संबंधित महिलेशी संपर्क साधला. मात्र, पलीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. सरतेशेवटी तिने २४ जानेवारी रोजी रात्री गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. आरोपी सूरजने आपल्यावर शारीरिक बळजबरी केल्याची तक्रार तिने नोंदविली.

सहायक पोलीस आयुक्तांनी जाणले वास्तव

सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांनीदेखील पोलीस ठाणे गाठून पीडिताची बाजू ऐकून घेतली. ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मनीषा सामटकर यांनी तिचे बयाण नोंदविले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळfraudधोकेबाजी