शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? ...वाला? विचारल्यानंतर ' ठेवून घ्या' असे खेवलकर यांनी दिले होते होकारार्थी उत्तर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
4
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
5
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
6
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
7
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
8
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
9
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
10
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
11
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
12
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
13
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
14
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
15
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
16
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
17
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
18
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
20
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?

दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात अनागोंदी; ‘जनारोग्य’ धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 21:57 IST

शहरासह तालुक्यातील १३३ गावांना रुग्णसेवा पुरविणारे येथील उपजिल्हा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. ना पुरेसे मनुष्यबळ, ना साधनसामग्री; अशा अडचणीमुळे रुग्णसेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. या रुग्णालयालाच उत्तम आरोग्यसेवेचा बूस्टर डोस देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नानाविध यंत्रसामग्री बंद अवस्थेत असताना रुग्णांना आवश्यक रक्तसाठाच उपलब्ध नसल्याचे वास्तव उघड झाले आहे.

ठळक मुद्देना साधनसामग्री, ना मनुष्यबळ : डॉक्टरांची वानवा, कॅबिनेट मशीन बंद , रक्ताचा पुरवठा नाही, रुग्ण वाऱ्यावर

किरण होले।लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शहरासह तालुक्यातील १३३ गावांना रुग्णसेवा पुरविणारे येथील उपजिल्हा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. ना पुरेसे मनुष्यबळ, ना साधनसामग्री; अशा अडचणीमुळे रुग्णसेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. या रुग्णालयालाच उत्तम आरोग्यसेवेचा बूस्टर डोस देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नानाविध यंत्रसामग्री बंद अवस्थेत असताना रुग्णांना आवश्यक रक्तसाठाच उपलब्ध नसल्याचे वास्तव उघड झाले आहे.तालुक्याचा भार सोसणाºया उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार ढेपाळल्याने ‘जनारोग्य’ धोक्यात आले आहे. सुविधांची वानवा असल्याने नागरिकांना नाइलाजास्तव खासगी दवाखान्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.हृदयरुग्णांकरिता आवश्यक ईसीजी यंत्रणा सहा महिन्यांपासून नादुरुस्त आहे. यामुळे रुग्णांना खासगी सेवा घ्यावा लागतात. बाळंतपणासाठी आवश्यक असलेल्या सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी स्त्रीरोग (गायनिक) तज्ज्ञ उपलब्ध नाही. याशिवाय उपलब्ध तज्ज्ञ आठवड्यातून दोन दिवस सेवा देत असल्याने अन्य दिवशी दाखल होणाºया प्रसूतांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक स्त्री रुग्णांना खासगी रुग्णालयांत जाण्याशिवाय पर्याय नाही.सहा महिन्यांत अनेक महिलांना अन्य दवाखान्यात सिझेरियन करावे लागल्याची वस्तुस्थिती आहे. रुग्णांना लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने बाहेरून औषधी आणण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, महिलांची सिझर पद्धतीने प्रसूती झाल्यानंतर रक्ताची अत्यंत निकड असते. तथापि, उपजिल्हा रुग्णालयात दोन महिन्यांपासून कोणत्याही गटाचे रक्त उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.वर्षा लोधी (रा. आराळा ) यांची १३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली. तिने गोंडस बाळाला जन्म दिला. तो आनंद साजरा होत असताना त्या प्रसूतेच्या अंगात रक्त कमी असल्याने तिला रक्ताची तातडीने आवश्यकता होती. मात्र, तिला जुळणारा रक्तगट उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने त्यांना अमरावतीत हलविण्यात आले. विशेष म्हणजे, बहुतांश साधारण आर्थिक स्थितीतील प्रसूता येथे दाखल होत असतात. या प्रकरणातदेखील परिस्थितीमुळे वर्षा ही अमरावतीला जाऊ इच्छित नव्हत्या. अशा घटनांमध्ये रक्तसाठा उपलब्ध नसल्याने भविष्यात प्राणहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण राहणार, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.दिवाळीच्या सुट्यांमुळे जिल्ह्यात कुठेही रक्तदान शिबिर घेण्यात आले नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवला. रुग्णालयातील कॅबिनेट मशीन बंद पडल्यामुळे येथे रक्त उपलब्ध झाले नाही. दोन दिवसांत मशीन दुरूस्त करून रक्ताची व्यवस्था करण्यात येईल.- सुनील राठोडवैद्यकीय अधिकारीउपजिल्हा रुग्णालय, दर्यापूर