शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

आरक्षण बदलाने फटका

By admin | Updated: October 7, 2016 00:24 IST

नुकत्याच जाहीर झालेल्या जि. प. सर्कल आरक्षणात तालुक्यातील चार सर्कल अनुसूचित जमातीकरिता राखीव झाले आहेत.

नव्या घराचा शोध : आयाराम-गयाराम प्रवृत्ती वाढणार सुमित हरकुट चांदूरबाजारनुकत्याच जाहीर झालेल्या जि. प. सर्कल आरक्षणात तालुक्यातील चार सर्कल अनुसूचित जमातीकरिता राखीव झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विद्यमान दिग्गजांना फटका बसला आहे. परिणामी या दिग्गज नेत्यांना जिल्हा परिषदेच्या सर्कलमधील नव्या मतदारसंघाचा शोध घ्यावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या जाहीर झालेल्या आरक्षणानुसार तालुक्यातील कुऱ्हा, शिरजगाव बंड, आसेगाव, शिरजगाव कसबा हे दिग्गजांची महत्त्वाची सर्कल अनुसूचित जमातीच्या महीला-पुरुष वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. एकूण सहा सर्कलपैकी चार सर्कल एसटी साठी राखीव झाल्याने जि. प. गाजविणाऱ्या दिग्गज नेत्यांची गोची झाली आहे. उर्वरित घाटलाडकी सर्कल नामाप्रककिता व करजगाव सर्कल सर्वसाधारण वर्गाकरिता ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्यमान नेत्यांची या दोन सर्कलमधून आपली जागा निश्चित करण्यासाठी चढाओढ निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत जि.प. चे विद्यमान सदस्य व माजी अध्यक्ष बबलू देशमुख हेसुद्धा सर्कलमधून प्रतिनिधीत्व करीत आहे. तसेच विद्यमान सदस्य सुरेखा ठाकरे या आसेगाव सर्कलमधून प्रतिनिधीत्व करीत असून शिरजगाव कसबा सर्कलमधून जि. प. माजी सभापती व माजी सदस्य मनोहर सुने हे प्रतिनिधीत्व करीत आहे. या तिघांचेही जि. प.सर्कल एसटीकरिता राखीव झाल्याने यांना नव्या जि. प. सर्कलचा शोध घ्यावा लागणार आहे. या दिग्गजांना सर्कल राखीव झाल्यामुळे आज जरी वरकरनी फटका बसत असल्याचे दिसत असले तरी अध्यक्षपदावर असताना बबलू देशमुख व सुरेखा ठाकरे यांनी सर्व जिल्हाभर विकास कामे केली आहे. त्यामुळे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील कोणत्याही जि. प. सर्कलमधून निवडून येण्याची शक्यता यांच्याकडे आहे. हे दिग्गज इतर ठिकाणाहून निवडून येवू शकले तरीही त्यांना तालुक्यात मतदार सद्या उपलब्ध न झाल्यास विकासाच्या बाबतीत चांदूरबाजार तालुक्याची फार मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही दिग्गजांनी तालुक्यातूनच उभे राहण्याचा विचार केला तर करजगाव व घाटलाडकी हे दोनच जि. प. सर्कल शिल्लक राहिले आहे. मात्र येथून निवडणूक लढवायची की नाही, हे त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. तालुक्यात जि. प. चे चार सर्कल राखीव झाल्याने निवडणुकीतील खरी रंगत आजच लोप पावली आहे.