लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर वकील संघाच्या निवडणुकी सर्व नऊ जागा परिवर्तन पॅनलने काबीज करीत सत्ताधारी सत्ता पॅनलचा धुव्वा उडविला. बुधवारी मतदानानंतर लगेच मतमोजणी झाली. त्यात परिवर्तनचे विजय गोडबोले अध्यक्षपदी, तर सचिवपदी आशिष अग्रवाल निवडून आले. एकतर्फी विजयाचा जल्लोष वकिलांनी साजरा केला.अचलपूर वकील संघाच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत बुधवारी बार कौन्सिलच्या सभागृहात मतदान घेण्यात आले. २१५ वकील मतदारांपैकी १६५ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. वकिलांचे सत्ता आणि परिवर्तन असे दोन गट आमने-सामने उभे ठाकले होते. कोषाध्यक्ष पदावर पूर्वीच परिवर्तन पॅनलचे मिलिंद झंवर यांची अविरोध निवड झाली होती. इतर सर्व पदांसाठी दुहेरी लढत झाली. आठ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात होते.अशी आहे नवीन कार्यकारिणीपरिवर्तन पॅनलकडून अध्यक्षपदी विजय गोडबोले, उपाध्यक्षपदी मो. सलीम, सचिवपदी आशिष अग्रवाल, सहसचिवपदी प्रशांत गाठे, तर चार सदस्यपदांवर मो. वसीम, नितीन घाटेवार, अनुराधा प्रधान आणि संतोष हिवराळे निवडून आले. विजयासाठी रवींद्र गोरले, सुरेंद्र घुलक्षे, दीपक देशमुख, सुदामा गिडवणी, अभिजित तनपुरे, विजय घाटे, नितीन चौधरी, रामदास वानखडे, महेश देशमुख आदी वकिलांनी अथक परिश्रम घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरकारी अभियोक्ता डी.ए. नवले यांनी निवडणुकीचे कामकाज हाताळले.
‘सत्ता’चा धुव्वा, अचलपूर न्यायालयात ‘परिवर्तन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:43 IST
अचलपूर वकील संघाच्या निवडणुकी सर्व नऊ जागा परिवर्तन पॅनलने काबीज करीत सत्ताधारी सत्ता पॅनलचा धुव्वा उडविला.
‘सत्ता’चा धुव्वा, अचलपूर न्यायालयात ‘परिवर्तन’
ठळक मुद्देसर्व जागा काबीज : अध्यक्ष विजय गोडबोले, सचिवपदी अग्रवाल